राज्यातील धरणे 100% भरणार का ? आतापर्यंत किती धरणे भरलीत ? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : गेली 17 ते 18 दिवस विश्रांती घेतल्यानंतर राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यातील मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाला पोषक वातावरण तयार होऊ लागले आहे.

विशेष म्हणजे काही भागात पाऊस सुरु देखील झाला आहे. राज्यातील कोकण अन विदर्भात पाऊस झाला आहे. तसेच आगामी चार दिवस म्हणजे गुरुवारपर्यंत राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात पाऊस पडणार असा अंदाज आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

विदर्भात मात्र आजचा दिवस पाऊस होणार आणि पुढील काही दिवस हवामान कोरडं राहणार अस सांगितलं जात आहे. परंतु विदर्भात आणि कोकणात ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र असे असले तरी राज्यात अजूनही मोठा पाऊस झालेला नाही.

यामुळे शेतकऱ्यांचे मोठा पाऊस केव्हा पडणार याकडे लक्ष लागून आहे. भारतीय हवामान विभागाने मात्र पुढल्या महिन्यात जोरदार पाऊस पडू शकतो असे सांगितले आहे. पुढल्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर वाढेल असे सांगितले जात आहे.

पण ऑगस्ट महिन्यात पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे अजूनही राज्यातील बहुतांशी धरणे 100% क्षमतेने भरलेली नाहीत. अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील कोणती धरणे फुल भरली आहेत आणि कोणत्या धरणात किती पाणीसाठा आहे याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या धरणात किती पाण्याचा साठा 

मिळालेल्या माहितीनुसार, जायकवाडी धरणात 33.97 टक्के एवढा पाण्याचा साठा आहे. येलदरी धरणाचा पाणीसाठा 59.91 टक्के एवढा आहे. माजलगाव धरणात 14.29% एवढे पाणी आहे. पैनगंगा धरणात 65.3 टक्के एवढे पाणी आहे. तेरणा 28.47% एवढे पाणी आहे.

मांजरा 25.48%, दुधना 26.76% एवढे भरले आहे. तसेच चाकसमान धरण 99.29% भरले आहे. पानशेत धरण 100 टक्के भरले आहे. खडकवासला 63.60%, भाटघर 88.6%, मुळशी 87.34%, तर पवना 97.87% भरले आहे.

कंदरीत वरील आकडेवारी पाहता पुणे विभागातील धरणे अधिक भरली आहेत आणि मराठवाडा विभागातील धरणे कमी भरल्याचे स्पष्ट होत आहे. यावरूनच मराठवाड्यात खूपच कमी पाऊस पडल्याचे स्पष्ट होत आहे.