Maharashtra News : महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या सोयीसाठी नुकताच केंद्र शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाने राज्यातील अहमदनगर सह 23 शहरांमध्ये नवीन शहर बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच ज्या शहरांमध्ये आधीच बस सेवा सुरू आहे त्या बसेस इलेक्ट्रिक बसमध्ये परावर्तित करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे राज्यातील 23 शहरांमधील सर्वसामान्य नागरिकांचा प्रवास जलद आणि सुरक्षित होणार आहे. केंद्र शासनाचा हा निर्णय राज्यातील दळणवळण व्यवस्था आणखी सक्षम करणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी सक्षम होईल असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील अनेक शहरांमधील शहर बस सेवा या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. काही शहरांमधील बस सेवा तर बंदच पडल्या आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील शहरी भागातील नागरिकांना प्रवासासाठी ऑटो रिक्षा किंवा इतर पर्यायी व्यवस्थेने प्रवास करावा लागत आहे.
यामुळे शहरातील नागरिकांचा दैनंदिन प्रवास महाग झाला आहे. आधीच महागाईने बेजार झालेली जनता यामुळे आणखी मोठ्या संकटात आपली आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला यामुळे मोठी कात्री बसत आहे. हेच कारण आहे की गेल्या दोन महिन्यांपूर्वी केंद्रशासनाने पीएम ई बस सेवा प्रकल्पांतर्गत देशातील 169 तर महाराष्ट्रातील 23 महापालिकांकडून बस सेवा पुन्हा एकदा सुरू करणे बाबत प्रस्ताव मागितले होते.
याच पार्श्वभूमीवर राज्यातील 23 महापालिकांनी केंद्र शासनाकडे सविस्तर प्रस्ताव सादर केले होते. दरम्यान राज्यातील महापालिकांकडून सादर झालेल्या या प्रस्तावावर नुकताच महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र सरकारच्या एका समितीने हे प्रस्ताव मंजूर केले आहेत. यामुळे आता राज्यातील 23 महापालिकांमध्ये नवीन ई-सिटी बस सेवा सुरू होणार आहे. विशेष म्हणजे या बससेवेसाठी आवश्यक असलेले चार्जिंग स्टेशन्स, बस थांबे आणि पार्किंगची व्यवस्था यासाठी होणाऱ्या संभाव्य खर्चाचे अंदाजपत्रक तातडीने पाठवण्याचे निर्देश संबंधित मनपा आयुक्तांना देण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार पीएमई बस सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून इलेक्ट्रिक बसेसच्या खरेदीसाठी, बांधकाम आणि चार्जिंग स्टेशनसाठी आणि बसेसच्या आकारानुसार प्रत्येक किलोमीटर मागे वीस ते 24 रुपयांचा मदत निधी केंद्र शासनाकडून दिला जाणार आहे. याशिवाय देखभाल दुरुस्तीसाठी देखील निम्मा खर्च केंद्र शासनाकडून पुरवला जाणार आहे.
यामुळे राज्यातील 23 शहरांमध्ये आता नवीन शहरी बस सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता लवकरच केंद्र शासनाने मंजूर केलेल्या या शहरांमध्ये इलेक्ट्रिक बस धावणार आहेत.
राज्यातील नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कल्याण डोंबिवली, नाशिक, ठाणे, वसई-विरार, अमरावती, भिवंडी, कोल्हापूर, मालेगाव, मीरा-भाईंदर, नांदेड-वाघाळा, सांगली, सोलापूर, उल्हासनगर, जळगाव, धुळे, अहमदनगर, लातूर, परभणी, चंद्रपूर, अकोला आणि इचलकरंजी या महानगरपालिका क्षेत्रात म्हणजे शहरात आता इलेक्ट्रिक बसेस सुरू होणार आहेत.