महाराष्ट्राच्या राजधानीत तयार होणार नवीन 5 उड्डाणपूल ! कोणत्या भागातील प्रवाशांना मिळणार दिलासा ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. राज्यात विविध रस्ते विकासाची कामे सुरू आहेत. यासोबतच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी राज्यातील विविध शहरांमध्ये मेट्रोमार्ग तयार केले जात आहे.

मुंबई, पुणे, नवी मुंबई, नागपूर यांसारख्या शहरांमध्ये विविध रस्ते विकासाची कामे सुरू आहेत. अशातच महाराष्ट्राच्या उपराजधानीबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार राज्याच्या उपराजधानीत आता नवीन पाच उड्डाणपूल तयार केले जाणार आहेत. यामुळे उपराजधानीतील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी सुटणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

खर तर महाराष्ट्राची उपराजधानी अर्थातच नागपुर संत्रा नगरी गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. विदर्भाच्या विकासात हातभार लावणारी संत्रा नगरी नागपूर आता वाहतूक कोंडीसाठी देखील विशेष ओळखले जाऊ लागले आहे. वाहतूक कोंडीमुळे शहरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

हेच कारण आहे की शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेट्रो सुरू करण्यात आली आहे. याशिवाय आता शहरात नवीन पाच उड्डाणपूल देखील तयार केले जाणार आहेत. सध्या स्थितीला शहरात काही उड्डाणपुलांचे काम सुरू आहे यासोबतच आणखी नव्याने पाच उड्डाणपूल तयार होणार आहेत.

या उड्डाणपुलामुळे उपराजधानी नागपूर मधील पूर्व, मध्य आणि दक्षिण भागातील वाहतूक कोंडी फुटेल असा आशावाद व्यक्त होत आहे. दरम्यान, या उड्डाणपूलांच्या प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने तब्बल 792 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे.

त्यामुळे केंद्रीय रस्ते वाहतूक मार्गमंत्री नितीन गडकरी तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात आता नवीन पाच उड्डाणपूलांची भर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे नागपूर शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे. आता आपण शहरात उभारले जाणारे हे पाच उड्डाणपूल कोणत्या भागात तयार होणार आहेत याविषयी जाणून घेऊया.

कुठे तयार होणार नवीन उड्डाणपूल

सध्या नागपूर शहरात इंदोरा ते थेट सक्करदरा उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर आहे. या उड्डाण पुलाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून लवकरात लवकर हे काम करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

शिवाय आता शहरात नवीन पाच उड्डाणपूल तयार होणार आहेत. हे नवीन उड्डाणपूल महारेलच्या कंपनीच्या माध्यमातून तयार केले जाणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून याच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होणार आहे.

  • रेशीमबाग ते केडीके कॉलेज, टेलिफोन एक्सचेंज चौक ते भांडे प्लॉट असा उड्डाणपूल तयार केला जाणार असून यासाठी २५१ कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे.
  • चंद्रशेखर आझाद चौक- गंगाजमुना ते मारवाडी चौक असा नवीन उड्डाणपूल तयार होईल आणि यासाठी ६६ कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे.
  • लकडगंज पोलिस स्टेशन ते वर्धमाननगर असाही उड्डाणपूल विकसित होणार आहे, यासाठी १३५ कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे.
  • नंदनवन, राजेंद्रनगर चौक ते हसनबाग चौक असा देखील उड्डाणंपुल विकसित केला जाणार आहे. यासाठी ६६ कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे.
  • वर्धमाननगर ते निर्मलनगरी, उमरेड रोड हा उड्डाणपूल विकसित होणार आहे. यासाठी २७४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.