Maharashtra New Two Storey Bus Station : नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील पहिल्या एसी बस स्थानकाचे लोकार्पण झाले आहे. राज्यातील पहिले एसी बस स्थानक उत्तर महाराष्ट्रात तयार झाले आहे. उत्तर महाराष्ट्रातील नासिक येथील अलीकडेच लोकार्पित झालेले मेळा बसस्थानक हे महाराष्ट्रातील पहिले एसी बस स्थानक ठरले आहे.
हे अत्याधुनिक बस स्थानक गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांमध्ये मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे. या बसस्थानकामुळे नासिक शहरातून ये-जा करणाऱ्या बस प्रवाशांना, लाल परी च्या प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येणार आहे.
अशातच आता महाराष्ट्रात आणखी एक नवीन बस स्थानकाचे लवकरच लोकार्पण होणार आहे. हे स्थानक अगदी एअरपोर्ट सारखे राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बारामती येथे नवीन दुमजली बस स्टेशनं तयार होत आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने हे मॉडर्न बसस्थानक बारामती येथे उभे राहिले आहे. हे दुमजली मॉडर्न बस स्थानक खूपच हायटेक असून यामध्ये अगदी एअरपोर्ट सारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
दरम्यान बारामती येथे तयार होत असलेले हे दुमजली बस स्थानक पूर्णपणे बांधून तयार झाले आहे. यामुळे याचे लोकार्पण केव्हा होणार हा मोठा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान या बसस्थानकाबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे.
एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आलेल्या माहितीनुसार या पुणे जिल्ह्यातील सुंदर वास्तूचे लवकरच उद्घाटन होणार आहे. फेब्रुवारी 2024 अखेरपर्यंत बारामती येथील या दुमजली मॉडर्न बस स्थानकाचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांनी फेब्रुवारी महिन्यातच या बसस्थानकाचे लोकार्पण होणार असे संकेत दिले होते.
यामुळे बारामतीकरांसहित सर्वच एसटी प्रवाशांना लवकरच या मॉडर्न बसस्थानकाचा वापर करता येईल अशी आशा व्यक्त होत आहे. विशेष बाब अशी की, या दुमजली बसस्थानकाच्या उद्घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत.
बसस्थानकाच्या विशेषता
बारामती येथील बस स्थानक दुमजली आहे. यामध्ये एअरपोर्टसारख्या सुविधा राहणार आहेत. या बसस्थानकात 22 प्लॅटफॉर्म आहेत. एवढेच नाही तर येथे वाहक आणि चालकांसाठी स्पेशल विश्रामगृह राहणार आहे. या बसस्थानकात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांसाठी विश्रामगृह राहील.
एवढेच नाही तर येथे अद्ययावत वॉशरूम राहणार आहेत. या बसस्थानकाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे येथे एक कॉन्फरन्स हॉल देखील असेल. म्हणजेच जर कोणाला बसस्थानकावरच मीटिंग घ्यायची असेल तर त्यांच्यासाठी देखील येथे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. निश्चितच, हे हायटेक बस स्थानक सुरू झाल्यानंतर लाल परीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे.