आनंदाची बातमी ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरात विकसित होणार नवीन रेल्वे स्टेशन, वाचा डिटेल्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra New Railway Station : गेल्या काही वर्षात राज्यातील पायाभूत सुविधा विकसित करण्यावर शासनाकडून भर दिला जात आहे. राज्यातील रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक सुधारित केली जात आहे.

राजधानी मुंबईमधील दळणवळण व्यवस्था देखील मजबूत केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये वेगवेगळी रस्ते विकासाची कामे केली जात आहेत. शिवाय वेगवेगळ्या मार्गांवर मेट्रो चालवली जात आहे. लोकलचा देखील विस्तार केला जात आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अशातच आता मुंबईकरांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राजधानी मुंबईत एक नवीन रेल्वे स्थानक विकसित केले जाणार आहे.

जसं की आपणास ठाऊकच आहे की गेल्या काही दशकांमध्ये राजधानी मुंबईची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मुंबई शहरात आणि शहरालगत वसलेल्या उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण आणि नागरिकीकरण झाले आहे.

वाढत्या शहरीकरणामुळे, नागरिकीकरणामुळे येथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मात्र तोकडी ठरू लागली आहे. हेच कारण आहे की शहरातील आणि उपनगरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आधीच्या तुलनेत अजून मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून अंबरनाथ ते बदलापूर दरम्यान एक नवीन रेल्वे स्टेशन विकसित होणार आहे. अंबरनाथ ते बदलापूर दरम्यान नवीन चिखलोली रेल्वे स्थानक तयार केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

खरंतर, अंबरनाथ ते बदलापूर दरम्यान गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झाले आहे. या भागात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली आहे. अंबरनाथ ते बदलापूर हे सात किलोमीटरचे अंतर असून या भागातील नागरिकांना वाढत्या लोकसंख्येमुळे प्रवासासाठी मोठ्या प्रमाणात ओढाताण करावे लागत आहे.

विशेष म्हणजे या भागातील नागरिकीकरण येत्या काही वर्षांमध्ये आणखी वाढणार आहे. अशा परिस्थितीत या भागात नवीन रेल्वे स्थानकाची मागणी केली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या भागात नवीन रेल्वे स्थानक तयार झाले पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान या भागातील नागरिकांची ही मागणी आता पूर्ण होणार आहे. कारण की, या भागात नवीन चिखलोली स्थानक तयार केले जाणार आहे. मध्य रेल्वेच्या माध्यमातून या नवीन रेल्वे स्थानकाची निर्मिती केली जाणार आहे.

यामुळे या भागातील नागरिकांचा दैनंदिन प्रवास अधिक गतिमान होणार आहे. दरम्यान, मध्ये रेल्वेने घेतलेल्या या नवीन निर्णयाचे या परिसरातील नागरिकांच्या माध्यमातून स्वागत केले जात आहे.