गुड न्यूज ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरात तयार होणार जगातील सर्वाधिक लांबीचे रेल्वे स्टेशन, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra New Metro Railway Station : राज्यासह संपूर्ण देशात गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न झाले आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून देशात मेक इन इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत तयार झालेली संपूर्ण भारतीय बनावटीची वंदे भारत एक्सप्रेस ही हाय स्पीड ट्रेन सुरू झाली आहे.

आतापर्यंत देशातील 34 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू झाली आहे. तसेच आगामी काही महिन्यांमध्ये आणखी काही महत्त्वाच्या मार्गावर या गाडीचे संचालन सुरू केले जाणार आहे.

एवढेच नाही तर आता रेल्वे प्रवाशांचा प्रवास जलद आणि गतिमान व्हावा यासाठी बुलेट ट्रेन देखील सुरू केली जाणार आहे. देशात 7 बुलेट ट्रेन प्रकल्प तयार केले जाणार आहेत.

यामध्ये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा देखील समावेश होतो. या प्रकल्पाचे काम आता युद्धपातळीवर सुरू झाले आहे. 2026 पर्यंत या प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू होणार आहे.

याशिवाय, राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या शहरांमध्ये मेट्रो देखील सुरू केली जात आहे. वास्तविक राजधानी मुंबईमध्ये दैनंदिन कामानिमित्त लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे.

मात्र लोकलने प्रवास करताना मुंबईकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. लोकलमध्ये दिवसेंदिवस गर्दी वाढत असल्याने अपघातांची संख्या देखील वाढत आहे. हेच कारण आहे की, मुंबईमध्ये आता मेट्रो चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सिप्झ ते कफ परेड दरम्यानही मेट्रो चालवली जाणार आहे. मेट्रो मार्ग प्रकल्प तीन अंतर्गत हा मार्ग विकसित होत असून या मार्गाचा पहिला टप्पा लवकरच सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे.

सिप्झ ते बीकेसी, वांद्रे हा या मार्गाचा पहिला टप्पा म्हणून ओळखला जाणार आहे. आटपाता नवीन वर्षात म्हणजेच 2024 च्या अगदी सुरुवातीलाच सुरू होऊ शकतो अशी माहिती समोर येत आहे.

विशेष म्हणजे या मेट्रोमार्गात देशातील सर्वाधिक लांबीचे मेट्रो स्टेशन विकसित केले जात आहे. या मार्गातील बीकेसी हे मेट्रो स्टेशन जगातील काही मोजक्याच सर्वाधिक लांबीच्या स्टेशनपैकी एक राहणार आहे.

हे स्टेशनं जंक्शन स्थानकाप्रमाणे राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथे अनेक गाड्या येऊन त्या टर्मिनेट होऊन मागे जाणार आहेत. या स्टेशनची लांबी ही 475 मीटर एवढी असेल. 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा