महाराष्ट्रात तयार होणार 128 किलोमीटर लांबीचा नवीन महामार्ग ! ‘ही’ दोन शहरे जोडली जाणार, 5 तासाचा प्रवास होणार 2 तासात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra New Expressway : मुंबईसह मुंबई महानगर क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षांपासून विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. मुंबई शहरात आणि उपनगरात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. वाढत्या वाहतूक कोंडीमुळे शहरातील नागरिकांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

परिणामी शहरातील ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आणि एमएमआर क्षेत्रातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी विरार ते अलिबाग दरम्यान कॉरिडॉर विकसित केला जात आहे.

आतापर्यंत हा कॉरिडॉर मात्र कागदावरच होता. याचे काम केव्हा सुरू होणार हाच सवाल सर्वसामान्य जनतेकडून उपस्थित केला जात होता. पण आता या महामार्गासंदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार या कॉरिडॉर साठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. डिसेंबर 2023 अखेरपर्यंत या कॉरिडॉर साठी आवश्यक असलेल्या जमिनीचे 80 टक्के एवढे भूसंपादन पूर्ण होईल आणि नवीन वर्षात या महामार्गाचे काम सुरू होईल असा दावा काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये करण्यात आला आहे.

या प्रकल्पासाठी लागणारी संपूर्ण जमीन मार्च-एप्रिल 2024 पर्यंत महापालिकेकडे येणार आहे आणि त्यानंतर या प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात सुरू होणार आहे. हा मार्ग ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांमधून जाणार आहे. या जिल्ह्यांमध्ये आता भूसंपादनाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

आतापर्यंत पालघर जिल्ह्यात जवळपास 98 टक्के एवढे भूसंपादन पूर्ण झाले असल्याची माहिती समोर आली आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील लवकरच संपूर्ण जमिनीचे भूसंपादन होणार आहे. यामुळे या प्रकल्पाचे काम नवीन वर्षात सुरू होणार हे जवळपास नक्की आहे.

या प्रकल्पा अंतर्गत एकूण 128 किलोमीटर लांबीचा कॉरिडॉर तयार केला जाणार असून याचे काम एकूण दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात 98 किलोमीटर आणि दुसऱ्या टप्प्यात 29 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

MMR अर्थातच मुंबई महानगर क्षेत्रात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जलद गतीने पोहोचता यावे यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. दरम्यान विरार-अलिबाग कॉरिडॉरमुळे विरार ते अलिबाग हे अंतर कमी होणार आहे. सध्या स्थितीला या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करण्यासाठी चार ते पाच तासांचा कालावधी खर्च करावा लागत आहे.

मात्र हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या दोन्ही शहरा दरम्यानचा प्रवास फक्त दीड ते दोन तासात पूर्ण होईल असा दावा केला जात आहे. खरे तर या प्रकल्पासाठी 2016 मध्ये डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार झाला होता. त्यानंतर या रिपोर्ट मध्ये किरकोळ स्वरूपाचा बदल झाला आणि डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट अंतिम करण्यात आला आहे.

आधी हा प्रकल्प एमएमआरडीए अर्थातच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून पूर्ण केला जाणार होता मात्र प्रकल्पाला होत असलेला विलंब पाहता या मार्गाचे काम आता राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा