Maharashtra New Expressway : राज्य रस्ते विकास महामंडळ नजीकच्या भविष्यात महाराष्ट्रात अनेक मोठमोठे महामार्ग विकसित करणार आहे. राज्यातील रस्ते व्यवस्था सक्षम व्हावी यासाठी महामंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून विरार ते अलिबाग दरम्यान मल्टी मॉडेल कॉरिडॉर विकसित होत आहे. हा प्रकल्प राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून तयार केला जाणार आहे.
दरम्यान, याच महत्त्वाकांक्षी प्रकल्पासंदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, विरार ते अलिबाग दरम्यान 126 किलोमीटर लांबीचा कॉरिडॉर तयार केला जात आहे. या बहुउद्देशीय या मार्गाचे एकूण दोन टप्प्यात काम होणार आहे.
पहिल्या टप्प्यात 98 किलोमीटर लांबीचे काम केले जाणार आहे आणि उर्वरित काम दुसऱ्या टप्प्यात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम एकूण 11 पॅकेजमध्ये होणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया देखील आता अंतिम टप्प्यात आली आहे.
या प्रकल्पासाठी देशातील 14 नामांकित कंपन्यांनी निविदा सादर केल्या असून या निविदा नुकत्याच उघडल्या गेल्या आहेत. आता या निविदांची छाननी पूर्ण केली जाणार आहे. सध्या ही छाननी प्रक्रिया सुरू असून येत्या काही दिवसात निविदा अंतिम केल्या जातील आणि त्यानंतर मग या प्रकल्पाचे प्रत्यक्षात बांधकाम सुरू होऊ शकणार आहे.
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 11 पॅकेजच्या कामासाठी 14 कंपन्यांनी एकूण 33 निविदा सादर केलेल्या आहेत. सध्या संपूर्ण देशभर 18 व्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू आहे. यामुळे या प्रकल्पाच्या तांत्रिक निविदा नंतरच्या प्रक्रियेला आचारसंहिता संपल्यानंतरच सुरवात होणार असं आहे.
म्हणजे प्रकल्पाची पुढील कारवाई लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच पुर्ण होणार आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडोरच्या बांधकामाला सुरुवात होणार असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.
या संदर्भात राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्याने एका प्रतिष्ठित वृत्त संस्थेला दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीचे निकाल जाहीर झालेत की लगेचच म्हणजे जूनअखेर आर्थिक निविदा आणि निविदा वाटपाची प्रक्रिया पूर्ण होईल.
फील्डवरील काम सप्टेंबरपर्यंत सुरू होणे अपेक्षित आहे. हा कॉरिडॉर पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून जाणार आहे. एमएमआर क्षेत्रातील हा महत्त्वाचा प्रकल्प सुरू करण्यासाठी एमएसआरडीसीने भूसंपादनाचे काम जवळपास पूर्ण केले आहे.
अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी पालघरमधील भूसंपादनाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे, तर रायगडमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. एकंदरीत येत्या काही दिवसात विरार अलीबाग मल्टी मोडेल कॉरिडॉर चे प्रत्यक्ष बांधकाम सुरू होणार आहे.
दरम्यान हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर विरार ते अलिबाग या दरम्यानचा प्रवास गतिमान होणार आहे. सध्या या प्रवासासाठी प्रवाशांना पाच तासांचा कालावधी खर्च करावा लागतोय. मात्र जेव्हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा या मार्गाने प्रवास केल्यास प्रवाशांना अवघ्या दीड तासांच्या कालावधीत प्रवास करता येणार आहे.