Maharashtra New Expressway : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध महामार्गांची कामे हाती घेण्यात आली आहेत. शहरातील दळणवळण व्यवस्था मजबूत व्हावी यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यात मुंबई ते नागपूर दरम्यान समृद्धी महामार्ग तयार केला जात आहे.
समृद्धी महामार्गअंतर्गत 701 किलोमीटर लांबीचा मार्ग तयार होत आहे. आतापर्यंत समृद्धी महामार्गाचा नागपूर ते भरविर हा सहाशे किलोमीटर लांबीचा टप्पा सर्वसामान्यांसाठी सुरू झाला असून उर्वरित 101 किलोमीटर लांबीचा टप्पा लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
एवढेच नाही तर राज्य शासनाने नागपूर ते गोवा दरम्यान शक्तीपीठ महामार्ग देखील प्रस्तावित केला आहे. शक्तीपीठ महामार्ग अंतर्गत 806 किलोमीटर लांबीचा मार्ग विकसित होणार असून याच्या अंतिम अलाइनमेंटला नुकतीच मंजुरी देखील मिळालेली आहे.
यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये या मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार अशी आशा व्यक्त होत आहे. असे चित्र असतानाच आता महाराष्ट्रात आणखी एक नवीन महामार्ग तयार होणार हे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने 109 किलोमीटर लांबीच्या नवीन चार पदरी महामार्ग उभारण्याच्या आराखड्याला नुकतीच मंजुरी दिली असल्याचे वृत्त एका प्रतिष्ठित वृत्त संस्थेच्या माध्यमातून समोर आले आहे.
राज्य रस्ते विकास महामंडळ समृद्धी महामार्गाला लागून सिंदखेडराजा ते शेगाव दरम्यान 109 किलोमीटर लांबीचा नवीन मार्ग विकसित करणार आहे. यामुळे मुंबई ते शेगाव हा प्रवास फक्त आणि फक्त सात तासात पूर्ण होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.
हा सिंदखेड राजा ते शेगाव दरम्यानचा 109 किलोमीटर लांबीचा चार पदरी महामार्ग विकसित झाल्यानंतर मुंबई ते सिंदखेडराजा हा प्रवास पाच तासात आणि सिंदखेडराजा ते शेगाव हा प्रवास दोन तासात असा मुंबई ते शेगाव संपूर्ण प्रवास सात तासात होईल असा विश्वास व्यक्त होत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथून समृद्धी महामार्गापासून या मार्गाची सुरुवात होईल आणि हा मार्ग शेगाव पर्यंत जाणार आहे. हा 109 किलोमीटर लांबीचा मार्ग राहील. हा चार पदरी महामार्ग पूर्णपणे ग्रीनफिल्ड कॉरिडॉर राहणार असून याला राज्य शासनाने मंजुरी देखील दिली आहे.
यामुळे मुंबई ते सिंदखेडराजा हा 413 किलोमीटर लांबीचा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना चार ते पाच तासांचा कालावधी खर्च करावा लागेल आणि पुढे सिंदखेडराजापासून शेगावपर्यंत दोन तासात जाता येणे शक्य होणार आहे.
खरे तर श्रीक्षेत्र शेगाव येथे मुंबईहून दररोज हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी जात असतात. यामुळे या महामार्गाची उभारणी झाल्यानंतर मुंबई मधल्या भाविकांना जलद गतीने शेगावला पोहोचता येईल अशी आशा व्यक्त होत आहे.