महाराष्ट्रात तयार होणार आणखी एक ग्रीनफिल्ड महामार्ग ! 400 किलोमीटर लांबीचा 6 लेनचा एक्सप्रेस वे ‘या’ 3 जिल्ह्यांना कनेक्ट करणार, कसा असेल Route ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra New Expressway : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. खरंतर पुढील वर्षी राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाचणार आहे याशिवाय पुढल्या वर्षी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा देखील थरार पाहायला मिळणार आहे. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून येत्या वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक होण्याचे संकेत मिळत आहेत.

त्यामुळे आत्तापासूनच निवडणुकीचे पडघम जोरात वाजू लागले आहे. सरकारकडून सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. शेतकरी, कर्मचारी, व्यापाऱ्यांसमवेत सर्वसामान्य नागरिकांसाठी शासनाकडून विविध निर्णय घेतले जात आहेत. विविध विकास कामांना गती देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

शातच आता महाराष्ट्रात एका नवीन महामार्गाच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. हा महामार्ग संपूर्ण ग्रीनफील्ड राहणार असून राज्यातील एकूण 3 जिल्ह्यांना कनेक्ट करणार आहे. या महामार्गाची जवळपास 400 किलोमीटर एवढी राहणार आहे. यामुळे महाराष्ट्राच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे. बळवली ते पत्रादेवी दरम्यान हा महामार्ग विकसित होणार आहे.

या मार्गाला कोकण ग्रीनफिल्ड महामार्ग म्हणून ओळखले जाणार आहे. दरम्यान या महामार्गाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार या महामार्गाच्या भूसंपादनाच्या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.

या पार्श्वभूमीवर या महामार्गामध्ये बाधित होणाऱ्या जमीनधारकांना नोटीसा बजावल्या जात आहेत. या मार्गाचे काम राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थातच एमएसआरडीसीच्या माध्यमातून केले जाणार आहे. हा कोकण ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे नवी मुंबई मध्ये विकसित होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडला जाणार आहे.

कसा असेल रूट ? 

या महामार्गाची एकूण लांबी 388 किलोमीटर एवढी राहील. हा एक सहा पदरी महामार्ग राहील. हा मार्ग रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधून प्रस्तावित करण्यात आला आहे.

रायगड जिह्यातील पेण, अलिबाग, रोहा, तळा, माणगाव, म्हसळा या गावातून जाणार आहे. रत्नागिरी जिह्यातील मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, रत्नागिरी, लांजा, राजापूर या गावातून हा महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे.

तसेच सिंधुदुर्ग जिह्यातील देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी या गावातून जाणार आहे. सदर महामार्ग रायगड जिल्ह्यातल्या पेन मधील बलवली येथून स्टार्ट होणार आहे आणि गोव्यातील पत्रा देवी पर्यंत तयार केला जाणार आहे.

या मार्गाचे काम एकूण चार टप्प्यात पूर्ण केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या महामार्गामुळे मुंबई ते कोकण हा प्रवास गतिमान होणार आहे. हा महामार्ग मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीचा बऱ्यापैकी कमी करण्यास सक्षम ठरेल असा आशावाद व्यक्त होत आहे.