महाराष्ट्रात 86 हजार कोटी रुपयांचा खर्च करून तयार होणार नवीन महामार्ग ! ‘या’ दोन शहरांमधील 21 तासाचा प्रवास होणार फक्त 7 तासात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra New Expressway : महाराष्ट्रात सध्या विविध प्रकल्पांची कामे सुरू आहेत. राज्यात मोठमोठ्या महामार्गांची निर्मिती केली जात आहे. मुंबई ते नागपूर दरम्यान समृद्धी महामार्ग तयार होत आहे. हा महामार्ग तब्बल सातशे किलोमीटर लांबीचा आहे.

या मार्गाचे आत्तापर्यंत 600 किलोमीटर लांबीचे काम देखील पूर्ण झाले आहे. नागपूर ते भरवीर पर्यंतचा सहाशे किलोमीटरचा टप्पा बांधून पूर्णपणे वाहतुकीसाठी सुरू झाला आहे.

विशेष म्हणजे भरवीर ते मुंबई पर्यंतचा उर्वरित शंभर किलोमीटरचा टप्पा देखील नवीन वर्षात सुरू केला जाणार आहे. एकंदरीत समृद्धी महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.

अशातच आता राज्यात आणखी एक नवीन महामार्गाचे काम हाती घेण्यात येणार आहे. नागपूर ते गोवा दरम्यान 86 हजार कोटी रुपये खर्च करून नवीन एक्सप्रेस तयार केला जाणार आहे.

हा एक्सप्रेस वे पूर्ण झाल्यानंतर या दोन शहरांमध्ये प्रवास फक्त सात तासात पूर्ण होणार आहे. सध्या स्थितीला या दोन शहरात दरम्यानचा प्रवास पूर्ण करण्यासाठी 21 तास खर्च करावे लागतात. म्हणजेच हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांचा तब्बल 14 तासांचा वेळ वाचणार आहे.

महामार्ग राज्यातील तीन शक्तीपीठे आणि 2 ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रांना परस्परांना जोडणार आहे. त्यामुळे राज्यातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे.

राज्यातील तिन्ही शक्तिपीठांचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भाविकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. हा महामार्ग वर्धा येथील पवनार ते पत्रा देवी दरम्यान तयार होणार आहे.

हा सहापदरी महामार्ग तब्बल 760 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. म्हणजे समृद्धी महामार्गापेक्षाही हा महामार्ग लांब राहणार आहे. या मार्गामुळे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि गोव्यातील अतिरिक्त क्षेत्र जोडले जाणार आहेत.

परिणामी राज्यातील एकात्मिक विकास या निमित्ताने सुनिश्चित होणार आहे. दरम्यान, या मार्गाचा DPR तयार करण्यासाठी 3 कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत.

हा मार्ग 2028-2029 पर्यंत विकसित होणार असे बोलले जात आहे. विशेष म्हणजे हा मार्ग समृद्धी महामार्गाला कनेक्ट होणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा