महाराष्ट्रात तयार होणार 400 किलोमीटर लांबीचा नवीन महामार्ग ! ‘या’ 2 शहरादरम्यानचा प्रवास होणार फक्त 5 तासात, वाचा डिटेल्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra New Expressway : महाराष्ट्राची राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर या दोन शहरादरम्यान समृद्धी महामार्ग विकसित केला जात आहे. समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास जलद होणार आहे. सध्या स्थितीला समृद्धी महामार्गाचे निम्म्याहून अधिक काम झाले आहे. नागपूर ते भरवीर पर्यंतचा समृद्धी महामार्गाचा टप्पा पूर्ण झाला असून यावर वाहतूक देखील सुरू झाली आहे.

नागपूर ते भरवीर हे जवळपास 600 किलोमीटर लांबीचे अंतर आहे. म्हणजे समृद्धी महामार्गाचे आता फक्त शंभर किलोमीटर लांबीचे काम बाकी आहे. विशेष म्हणजे हे देखील कामात लवकरच पूर्ण केले जाणार आहे. पुढील वर्षी संपूर्ण समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्याचे नियोजन राज्य रस्ते विकास महामंडळाने आखले आहे. दरम्यान, महाराष्ट्रात समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर आणखी एका महामार्गाची निर्मिती केली जाणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

समृद्धीच्या धर्तीवर मुंबई-सिंधुदुर्ग ग्रीनफिल्ड कोकण एक्सप्रेस वे तयार केला जाणार आहे. जुलै 2023 मध्ये या महामार्गाच्या अंतिम अलाइनमेंटला मंजुरी देण्यात आली आहे. एवढेच नाही तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी या महामार्गासाठी 100 मीटर रुंदीची जमीन संपादित करण्यासाठी शासनाने मान्यता देखील दिली आहे. यामुळे येत्या काही दिवसात या मार्गासाठी जमिनीचे संपादन पूर्ण होईल आणि त्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.

मुंबई ते गोवा प्रवास फक्त 5 तासात ! 

या महामार्गामुळे मुंबई ते सिंधुदुर्ग हा प्रवास फक्त तीन तासात पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे या मार्गाचा फायदा मुंबई ते गोवा प्रवास करणाऱ्यांना देखील मिळणार आहे. मुंबई ते गोव्याचा प्रवास या मार्गामुळे पाच तासात पूर्ण होणे शक्य होणार आहे. सध्या स्थितीला मुंबई ते सिंधुदुर्ग हा प्रवास करण्यासाठी जवळपास सहा ते सात तासांचा वेळ लागत आहे. याचा अर्थ हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर प्रवाशाच्या वेळेत तब्बल 3 ते 4 तासांची बचत होणार आहे.

ताशी 100 किलोमीटर वेगाने धावतील वाहने

हा नवीन महामार्ग 388 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. हा मार्ग नवी मुंबई मधील नव्याने विकसित होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडला जाणार आहे. या मार्गावर ताशी 100 किलोमीटर वेगाने वाहने धावण्यास सक्षम राहणार आहेत. परिणामी, मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास गतिमान होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या मार्गाचे काम एकूण चार टप्प्यात होणार आहे.

पहिल्या पॅकेजमध्ये पेण ते रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेपर्यंत 94.40 किमीचे काम केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीपासून गुहागरपर्यंत 69.39 किलोमीटरचा एक्सप्रेस – वे चे काम केले जाणार आहे.

तिसऱ्या टप्प्यात गुहागर ते चिपळूणपर्यंत 122.81 किलोमीटरचा आणि चौथ्या टप्प्यात पत्रादेवी सीमेपासून गोवा राज्याच्या सीमेपर्यंत 100.84 किमीचा एक्सप्रेस – वे तयार केला जाणार आहे. दरम्यान हा महामार्ग तयार होण्यासाठी चार वर्षांचा काळ लागणार असून यासाठी 70 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी जवळपास 4,205 हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे.