Maharashtra New Cricket Stadium : महाराष्ट्रातील क्रिकेट प्रेमींसाठी, क्रीडा प्रेमींसाठी एक मोठी बातमी आहे. ती म्हणजे महाराष्ट्रात आणखी एक नवीन भव्य आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम विकसित केले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे क्रिकेट स्टेडियम मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गलगत तयार होणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, राज्य रस्ते विकास महामंडळाने समृद्धी महामार्ग लगत असणारी आपली जागा भाडेतत्त्वावर निविदा प्रक्रिया अंतर्गत विविध खाजगी संस्था कंपन्यांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
राज्य रस्ते विकास महामंडळाने समृद्धी महामार्ग जिथे संपतो त्या भिवंडीच्या आमने या गावापासून हाकेच्या अंतरावर असणारी जागा 60 वर्ष कालावधीसाठी भाडेतत्त्वावर क्रिकेट ग्राउंडसाठी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. क्रिकेट स्टेडियम साठी ही जागा राखीव आहे.
भिवंडीतील वडपे गावापासून अगदी पाच किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे. ही जागा राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात असून क्रिकेट ग्राउंडसाठी राखीव आहे.
दरम्यान यावर क्रिकेट स्टेडियम विकसित करण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने गेल्या वर्षी अखेरीस निविदा प्रसिद्ध केली होती. जानेवारी 2024 अखेर निविदा सादर करण्याची मुदत देण्यात आलेली होती. यानुसार एमसीएने स्वारस्य निविदा सादर केली आहे.
दरम्यान ही निविदा छाननी करून राज्य रस्ते विकास महामंडळाने ही जागा एमसीएला देण्याबाबतचा प्रस्ताव ठाणे जिल्हाधिकार्यांकडे पाठवला. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, हा सदर भूखंड 50 एकराचा आहे.
दरम्यान याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे सबमिट झाल्यानंतर जिल्हाधिकारी महोदय यांनी अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे.
जर या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिली तर हा सदर 50 एकराचा भूखंड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम तयार करण्यासाठी एमसीएकडे सुपूर्द केला जाणार आहे. तथापि, याबाबतचा निर्णय लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आणि केंद्रात नवीन सरकार सत्तेत आल्यानंतरच होणार असे दिसत आहे.
कारण की आचारसंहिता कालावधीत याबाबतचा निर्णय होणार नाहीये. यामुळे चार जून नंतर या संदर्भातील निर्णय होऊ शकतो अशी आशा जाणकार लोकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान या प्रस्तावाला राज्य सरकारचा हिरवा कंदील मिळाला तर ठाण्यात पहिलेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य असे क्रिकेट स्टेडियम विकसित होणार आहे आणि यामुळे खऱ्या अर्थाने ठाण्याच्या वैभवात भर पडेल आणि ठाणे तथा आजूबाजूच्या परिसरातील आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना हक्काचे क्रिकेट ग्राउंड उपलब्ध होणार आहे. यामुळे या परिसरात भविष्यात अनेक क्रिकेटपटू घडतील अशी आशा बोलून दाखवली जात आहे.