Maharashtra New Bus Station : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध विकास कामे पूर्ण झाली आहेत. वेगवेगळे प्रकल्प गेल्या काही वर्षांमध्ये पूर्णत्वास गेली आहेत. प्रामुख्याने रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न झाले आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या शहरात राज्यातील पहिले एसी बस स्टेशन विकसित झाले आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक शहरात राज्यातील पहिले एसी बस स्थानक तयार करण्यात आले आहे. खरे तर नासिक हे शहर पुणे-मुंबई-नाशिक या सुवर्ण त्रिकोणातील महत्त्वाचे शहर आहे. या शहरांच्या विकासावरूनच खऱ्या अर्थाने राज्याच्या विकासाचे मोजमाप होते असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही.
हेच कारण आहे की या तिन्ही शहरांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान नाशिक शहराच्या विकासात भर पडावी म्हणून येथील मेळा बसस्थानकाचा कायापालट करण्यात आला आहे.
नाशिक शहरात एसी बस स्थानक तयार झाले आहे. Nashik मधील मेळा बस स्थानक हे राज्यातील पहिले एसी बस स्थानक काल अर्थातच 10 फेब्रुवारी 2024 पासून सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले आहे.
हे बस स्थानक एअरपोर्ट प्रमाणे विकसित करण्यात आले आहे. काल राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या बसस्थानकाचे उद्घाटन संपन्न झाले आहे.
अर्थातच आता हे बसस्थानक सर्वसामान्यांसाठी सुरू झाले आहे. दरम्यान आता आपण जागतिक दर्जाचे हे नवीन बस स्थानक नेमके कसे आहे, यात प्रवाशांना कोणकोणत्या सुविधा मिळणार याविषयी अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसे आहे राज्यातील पहिले एसी बस स्थानक?
या बसस्थानकाचे वैशिष्ट्य म्हणजे हे राज्यातील पहिले असे बस स्टेशन आहे, ज्यामध्ये एअरपोर्ट प्रमाणे एसी बसवण्यात आली आहे. या बस स्टेशनवर वीस प्लॅटफॉर्म असून यापैकी चार प्लॅटफॉर्मवर एसी आहेत.
म्हणजेच आता नागरिकांना एसी मध्ये बसून बसची वाट पाहत येणार आहे. परिणामी एसटी प्रवाशांचा प्रवास आरामदायी होणार आहे. नाशिक शहरात बसने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
महिला चालक व वाहक तथा पुरुष चालक व वाहक यांच्यासाठी स्पेशल विश्रामगृह तयार करण्यात आले आहे. बसस्थानकातील अधिकाऱ्यांसाठी देखील स्पेशल विश्रामगृह राहणार आहे. स्तनदा मातांसाठी स्वातंत्र्य हिरकणी कक्ष तयार करण्यात आला आहे.
याशिवाय अपंग प्रवाशांसाठी स्पेशल वॉश रूम तयार करण्यात आले आहे. यांसारख्या अनेक छोट्या मोठ्या सुविधा या नव्याने सुरू झालेल्या बचत स्थानकात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.