नमो शेतकरीचा पहिला हप्ता केव्हा मिळणार? कृषिमंत्री म्हणतात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Namo Shetkari Yojana : महाराष्ट्र राज्य शासनाने केंद्र शासनाच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी योजना सुरू केली आहे. नमो शेतकरी योजनेची घोषणा राज्य शासनाचा अर्थसंकल्प 2023-24 मध्ये करण्यात आली आहे. या अंतर्गत पीएम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच दरवर्षी सहा हजार रुपयाची रक्कम शेतकऱ्यांना दिली जाणार आहे.

नमो शेतकरी योजनेअंतर्गत एका वर्षात दोन हजार रुपयाचे तीन हप्ते वितरित होणार आहेत. विशेष म्हणजे पीएम किसान योजनेसाठी जे शेतकरी पात्र राहणार आहेत तेच शेतकरी नमो शेतकरी साठी पात्र केले जाणार आहेत. याचा अर्थ राज्यातील पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना आता पीएम किसानचे 6000 आणि नमो शेतकरी चे 6000 असे एकूण 12 हजार रुपये दरवर्षी मिळणार आहेत.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, नमो शेतकरी योजनेची घोषणा केल्यानंतर या योजनेसाठी राज्य शासनाने निधीची तरतूदही केली आहे. मात्र तरीही या योजनेचा पहिला हप्ता अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झालेला नाही. खरंतर नमो शेतकरीचा पहिला हप्ता हा पीएम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्यासोबत वितरित केला जाईल अशी शक्यता होती.

अनेक मीडिया रिपोर्ट्स मध्ये याबाबत दावा केला जात होता. मात्र पीएम किसानचा चौदावा हप्ता 27 जुलै 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला आहे. म्हणजे आता पीएम किसानचा चौदावा हप्ता वितरित करून एका महिन्याहून अधिकचा काळ उलटला आहे. मात्र तरीही नमो शेतकरीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना मिळालेला नाही.

यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून नमो शेतकरीचा पहिला हप्ता केव्हा मिळेल? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान याबाबत राज्याचे नवोदित कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. मुंडे यांनी सांगितल्याप्रमाणे या योजनेचा पहिला हप्ता हा लवकरच वितरित केला जाणार आहे. त्यांनी या योजनेबाबत नुकतीच एक महत्त्वाची आढावा बैठक घेतली आहे.

या बैठकीत त्यांनी या योजनेचा पहिला हफ्ता लवकरात लवकर पात्र शेतकऱ्यांना मिळेल असे सांगितले आहे. मुंडे यांनी यावेळी नमो शेतकरी योजनेसाठी पावसाळी अधिवेशनात 4000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती देखील दिली आहे. तसेच या निधीतून या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता वितरित होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

राज्यात अजूनही अनेक भागात समाधानकारक असा पाऊस पडलेला नसल्याने शेतकरी बांधव संकटात आले आहेत. यामुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी या योजनेचा पहिला हप्ता लवकर वितरित होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी या बैठकीत नमूद केले आहे.

या पार्श्वभूमीवर त्यांनी संबंधितांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे आता या चालू सप्टेंबर महिन्यात तरी या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होतो का? हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.