Maharashtra Monsoon News : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र सहित देशभरातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेचा हाहाकार पाहायाला मिळत आहे. यामुळे साऱ्यांचेच मानसून कडे लक्ष लागले आहे. मान्सूनच आगमन कधी होणार ? हाच सवाल सातत्याने उपस्थित केला जात आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, यावर्षी मान्सूनचे अंदमानात वेळे आधीच आगमन झाले आहे.
दरवर्षी अंदमानात 22 मे ला दाखल होणारा मान्सून यंदा 19 मे ला दाखल झाला आहे. विशेष बाब अशी की, केरळमध्ये देखील यंदा वेळेआधीच मान्सूनचे आगमन होणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही तास केरळमध्ये मान्सूनची एन्ट्री होणार आहे.
भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर लगेचच माहिती दिली जाणार आहे. सध्या मान्सूनच्या प्रवासासाठी पोषक हवामान असून येत्या काही तासात तो केरळमध्ये दाखल होणार आहे.
दरम्यान केरळमध्ये मान्सून आगमन झाल्यानंतर देशभरात उष्णतेचा जोर काहीसा कमी होणार आहे. 31 मे पासून तापमानात घट होणार असा अंदाज आहे.
खरं तर भारतीय हवामान विभागाने 31 मे ला केरळमध्ये मान्सून दाखल होणार असा अंदाज गेल्या काही दिवसांपूर्वी जाहीर केला होता.
मात्र काल भारतीय हवामान विभागाने येत्या 24 तासात मान्सूनचे केरळमध्ये आगमन होणार असे म्हटले आहे. यानुसार आज मानसून केरळ मध्ये पोहोचणार असे चित्र आहे.
यामुळे सध्या शेतकऱ्यांसहित सारेच जण मोठ्या उत्साहात आहेत. दरम्यान आता आपण महाराष्ट्रात मान्सून आगमन नेमकं कधी होणार याबाबत जाणून घेणार आहोत.
कधी दाखल होणार महाराष्ट्रात ?
महाराष्ट्रात यावर्षी 8 जुनच्या सुमारास मानसून आगमन होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. 8 जूनच्या सुमारास महाराष्ट्रातील तळ कोकणात म्हणजेच दक्षिण कोकणात मान्सून येणार आहे.
यानंतर 11 जून च्या आसपास तो मुंबईत दाखल होईल. पुढे चार दिवसांनी म्हणजेच 15 जूनच्या सुमारास मान्सून नाशिक, अहमदनगर, पुणे, विदर्भ समवेत संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे.