महाराष्ट्रातील ‘या’ दूध संघाने दूध खरेदी दरात केली वाढ, आता प्रतिलिटर मिळणार एवढा भाव, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Milk Rate : राज्यातील शेतकरी बांधव शेती सोबतच पशुपालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात. राज्यात म्हशींचे आणि गायींचे मोठ्या प्रमाणात संगोपन केले जाते. पशुपालन प्रामुख्याने दुग्ध उत्पादनासाठी करतात. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये पशुपालन हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी आतबट्ट्याचा ठरत आहे.

याचे प्रमुख कारण म्हणजे पशुखाद्याच्या दरात झालेली भरमसाठ वाढ. एकीकडे पशुखाद्याच्या दरात, इंधनाच्या दरात आणि महागाई मध्ये मोठी वाढ होत आहे तर दुसरीकडे दुधाच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. परिणामी आता पशुपालन हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी डोईजड ठरत आहे. अशातच आता पशुपालक शेतकऱ्यांसाठी गोकुळ दूध संघाने एक अतिशय मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थातच गोकुळने म्हैस दूध उत्पादकांसाठी म्हशीच्या दरात प्रति लिटर दीड रुपयांपर्यंतची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी दूध उत्पादक संघाने गायीच्या दूध दरात दोन रुपयांची कपात करण्याचे देखील जाहीर केले आहे. अशा परिस्थितीत गोकुळचा हा निर्णय गोकुळ दूध उत्पादक संघाशी निगडित असलेल्या म्हैस दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे तर गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा निर्णय मोठा मारक ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गोकुळ दूध उत्पादक संचालक मंडळाच्या बैठकीत म्हशीच्या दुध दरात प्रतिलिटर दीड रुपयांची वाढ करण्याचा आणि गायीच्या दूध दरात प्रतिलिटर दोन रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

डोंगळे यांनी सांगितल्याप्रमाणे संचालक मंडळाच्या बैठकीत झालेला हा निर्णय एक ऑक्टोबर 2023 पासून लागू केला जाणार आहे. गोकुळ दूध संघाशी निगडित असलेल्या म्हैस दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी हा निर्णय घेतला गेला असल्याचे सांगितले जात आहे. तसेच गायीच्या दूध संकलनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने गायीच्या दुध दरात कपात करण्यात आली आहे.

कसे असतील नवीन दर

दूध संघाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, म्हशीचे ६.० फॅट व ९.० एस.एन.एफ असलेले दूध आतापर्यंत 49 रुपये आणि 50 पैसे प्रतिलिटर या दराने खरेदी केले जात होते मात्र यामध्ये आता एक रुपयांची वाढ झाली असल्याने ५०. ५० रुपये प्रति लिटर दराने दूध खरेदी केले जाणार आहे.

तसेच म्हशीचे ६.५ फॅट व ९.० एस.एन.एफ दूध आता प्रतिलिटर ५२.८० रुपयाप्रमाणे खरेदी केले जाणार असून याआधी या दुधाला ५१.३० एवढा दर दिला जात होता. तसेच गाईच्या दुधामध्‍ये दोन रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गाईचे ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ चे दूध आता 33 रुपये प्रति लिटर दराने खरेदी केले जाणार असून याआधी हे दूध 35 रुपये प्रति लिटर दराने खरेदी केले जात होते.