गुड न्यूज ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरात विकसित होणार 43 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग, केंद्रीय मंत्र्यांची मोठी माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Metro News : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये वेगवेगळ्या विकास कामांची प्रकल्प हाती घेण्यात आली आहेत. देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुधारण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

रेल्वे वाहतुकीत सुधारणा व्हावी म्हणून बुलेट ट्रेन आणि मेट्रोचे प्रोजेक्ट हाती घेण्यात आले आहेत.महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये मेट्रो सारखे प्रकल्प राबवले जात आहेत.

सध्या देशातील अनेक शहरांमध्ये मेट्रो सुरू आहे. यामध्ये राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर या तीन शहरांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण भारतात आतापर्यंत 903 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग तयार झाले आहेत. यापैकी 40 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग उपराजधानी नागपूर मध्ये विकसित झाले आहे.

अशातच आता नागपूरकरांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. म्हणजे नागपूर शहरात मेट्रोचा दुसरा टप्पा कार्यान्वित केला जाणार आहे.

या अंतर्गत आणखी 43 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग शहरात विकसित होणार असल्याची माहिती केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांच्या माध्यमातून समोर आली आहे.

यामुळे उपराजधानी नागपूरमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी सक्षम होणार आहे. खरे तर उपराजधानीत पहिल्या टप्प्यात सुरू झालेल्या चाळीस किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

यामुळे नागपूरकरांचा प्रवास गतिमान झाला आहे. परिणामी शहराचा आणि जिल्ह्याचा विकास सुनिश्चित होऊ लागला आहे. आता शहरात मेट्रोचा दुसरा टप्पा राबवला जाणार आहे.

या दुसऱ्या टप्प्यात मिहान ते एमआयडीसीईएसआर, ऑटोमोटिव्ह चौक ते कन्हान नदी, लोकमान्य नगर ते हिंगणा, प्रजापती नगर ते ट्रांसपोर्ट नगर असा एकूण 43.80 किमीचा मेट्रो मार्ग विकसित केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी 6 हजार 708 कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा