दिलासादायक ! राज्यातील ‘या’ बाजारात कांद्याला मिळाला हंगामातील विक्रमी दर ! पण….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Kanda Bajarbhav Today : गेली अनेक महिने राज्यातील कांदा बाजार मंदीत होता. याचा परिणाम म्हणून राज्यातील नासिक, अहमदनगर, पुणे, सातार, सांगली, कोल्हापूर सहित पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख कांदा उत्पादक जिल्ह्यात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

अनेक शेतकऱ्यांना पिकासाठी आलेला उत्पादन खर्च देखील भरून काढता आला नाही. यामुळे राज्यातील शेतकरी कांदा दरात सुधारणा व्हावी अशी आशा बाळगून होते. आता शेतकऱ्यांची ही इच्छा पूर्ण झाली आहे. दरात आता वाढ होऊ लागली आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कांद्याला राज्यातील काही बाजारात 2500 रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिकचा कमाल दर मिळत आहे. विशेष म्हणजे सरासरी बाजार भाव देखील वाढले आहेत. सध्या राज्यात एक हजार रुपये प्रति क्विंटल ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल दरम्यान सरासरी दर नमूद केले जात आहेत.

उन्हाळी मालाच्या भावात देखील वाढ झाली आहे. पण असे असले तरी अवकाळी पावसामुळे उन्हाळी कांदा पिकाला मोठा फटका बसला असल्याने शेतकऱ्यांना खूपच कमी प्रमाणात उत्पादन मिळाले आहे. शेतकऱ्यांच्या मते, कांद्याची एकरी उत्पादकता कमी झाली आहे.

यामुळे दरवाढ होत असली तरी देखील याचा शेतकऱ्यांना खूपच मोठा फायदा होणार नाही असे मत व्यक्त होत आहे. मात्र गेली सहा ते सात महिने कवडीमोल दरात कांदा विकला असल्याने सध्या बाजारातील ही तेजी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक सिद्ध होत आहे. दरम्यान आज राज्यातील एका महत्त्वाच्या बाजारात कांद्याला 2700 रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक दर मिळाला आहे.

कोणत्या बाजारात मिळाला सर्वोच्च भाव

आज राज्यातील पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 2752 प्रति क्विंटल एवढा कमाल भाव मिळाला आहे. या मार्केटमध्ये आज 28 हजार 600 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली होती. यात 350 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान, 2752 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल आणि 1400 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर नमूद करण्यात आला आहे.

मात्र असे असले तरी राज्यातील काही बाजारात अजूनही कांद्याला अपेक्षित असा दर मिळत नसल्याचे चित्र आहे. धुळे, येवला अंदरसुल, चाळीसगाव या बाजारात कांद्याला 1500 रुपये प्रतिक्विंटल पेक्षा कमी दर मिळत आहे. या बाजारात सरासरी भाव हे 1000 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास आहेत.