महाराष्ट्र हवामान अंदाज : राज्यातील हवामानात ‘या’ तारखेपासून होणार मोठा बदल, पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाची मोठी माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Havaman Andaj : यावर्षी मान्सून सुरू होण्याआधी एका गोष्टीची खूपच चर्चा झाली. ही चर्चा होती एल निनो बाबत. यावर्षी एल निनोमुळे दुष्काळ पडणार असा अंदाज अनेक हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थांनी व्यक्त केला. यामुळे मान्सून सुरू होण्याआधीच शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र हवामान विभागाने एलनिनोचा प्रभाव राहणार असला तरी देखील सरासरी एवढा पाऊस पडणार अशी माहिती दिली होती.

दरम्यान यंदा मान्सूनचे उशिराने आगमन झाले. भारताच्या मुख्य भूमीत आणि महाराष्ट्राचे मुख्य भूमीत देखील यंदा मानसून उशिराने दाखल झाला. राज्यात जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. परंतु जुलै महिन्यात राज्यातील बहुतांशी भागात जोरदार पाऊस झाला. जुलैमध्ये राज्यातील कोकण आणि विदर्भ विभागात जोरदार पावसाची जोरदार हजेरी लागली. या दोन्ही विभागातील काही ठिकाणी अतिवृष्टी देखील पाहायला मिळाले.

अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाले आणि यामुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले. अनेक भागात शेत जमिनी खरडून निघाल्यात आणि खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. मात्र आता गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पावसाचा जोर कमालीचा कमी झाला आहे. पावसाने तब्बल दहा दिवसांपेक्षा अधिक काळ उघडीप दिली असल्याने शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढत आहे.

अशातच भारतीय हवामान विभागाने आगामी काही दिवस राज्यात पावसाचा जोर कमी राहणार असा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच आज आठ ऑगस्ट रोजी राज्यातील कोणत्याच भागाला पावसाचा अलर्ट देण्यात आलेला नाही. यामुळे राज्यात आणखी किती दिवस पावसाची उघडीप राहणार आणि केव्हा जोरदार पावसाला सुरुवात होणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून वारंवार विचारला जात आहे. आता याबाबत हवामान विभागाने माहिती दिली आहे.

पुणे हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात 10 ऑगस्टपर्यंत कुठेच जोरदार पाऊस पडणार नाही. मात्र तीन दिवसानंतर राज्यातील कोकण भागात पावसाची शक्यता आहे. तसेच तीन दिवसानंतर हिमालयाच्या पायथ्याशी पाऊस सुरु होणार असा अंदाज यावेळी हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.

बिहार, उत्तर प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगालमध्ये देखील मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचे सांगितले जात आहे. यासोबतच राज्यात आता 15 ऑगस्ट नंतरच जोरदार पावसाला सुरुवात होणार असल्याचे सांगितले जात आहे. जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी देखील राज्यात 15 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा