Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रातील हवामानात आता बदल पाहायला मिळत आहे. आता नागरिकांना ऑक्टोबर हिट पासून दिलासा मिळाला आहे. सकाळच्या किमान तापमानात मोठ्या प्रमाणात घट होत आहे. यामुळे सकाळी सकाळी गारठा जाणवत आहे. पण दुपारचे तापमान अजूनही सरासरीच्या पातळीवरच आहे. कमाल तापमानात अजूनही अपेक्षित अशी घट झालेली नाही.
यामुळे अजूनही काही ठिकाणी दुपारी उन्हाची चटके बसत आहेत. अशातच मात्र हवामान खात्याने 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. अर्थातच हिवाळ्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. विशेष म्हणजे हवामान खात्याने आगामी दोन ते तीन दिवस राज्यात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता वर्तवली आहे.
ढगाळ हवामानाची शक्यता असल्याने नागरिकांकडून आता पाऊसही पडणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावर हवामान विभागाने देखील महत्त्वाची अपडेट दिली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात राज्यातील हवामानात थोडा बदल झाला आहे.
यानुसार आता उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर फारच कमी झाला आहे. तसेच बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे आपल्या राज्याच्या दिशेने येऊ लागले आहेत. याशिवाय आता दक्षिण भारतात ईशान्य मोसमी पाऊस म्हणजे ईशान्य मानसून सक्रिय झाला आहे. यामुळे त्या भागात पाऊस सुरू आहे. दक्षिण भारतातील विविध राज्यांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे.
दरम्यान या सर्व हवामान बदलाचा आपल्या राज्यावर परिणाम होत आहे. याचा परिणाम म्हणून राज्यात ढगाळ वातावरण तयार होत आहे. ढगाळ वातावरण तयार होणार असा अंदाज असल्याने पाऊसही पडेल का हा सवाल उपस्थित होत आहे. पण हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस महाराष्ट्रात ढगाळ हवामान राहील मात्र पाऊस पडणार नाही असे स्पष्ट केले आहे.