राजधानी मुंबईसह महाराष्ट्रात कधीपासून सुरू होणार जोरदार पाऊस ! हवामान विभागाने दिली मोठी अपडेट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Havaman Andaj : गेल्या जुलै महिन्यात राजधानी मुंबईसह संपूर्ण कोकण विभागात जोरदार पाऊस झाला होता. कोकणातच नाही तर राज्यातील विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर गेल्या महिन्यात चांगला होता.

यामुळे राज्यात शेतीकामांनी वेग घेतला होता. चांगला पाऊस झाला म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि तूर पिकाला खताची मात्रा देखील दिली. शिवाय खरिपातील पिकांना महागड्या औषधांची फवारणी केली. मात्र आता या चालू ऑगस्ट महिन्यात एकदाही मुसळधार पाऊस झाला नाही.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

ऑगस्ट महिन्यातील जवळपास तीन आठवडे उलटत चालले आहेत तरीदेखील राज्यात जोरदार पाऊस झालेला नाही. यामुळे ज्या पिकांना खते देण्यात आली होती ती पिके आता करपू लागली आहेत. परिणामी पेरणीसाठी केलेला हजारो रुपयांचा खर्च आणि खतांसाठी, औषधांसाठी आलेला खर्च वाया जाण्याची भीती आता व्यक्त केली जात आहे.

या अशा बिकट परिस्थितीत आता शेतकऱ्यांना जोरदार पावसाची आतुरता लागली असून सर्वत्र मुसळधार पावसाची वाट पाहिली जात आहे. खरंतर भारतीय हवामान खात्याने 19 ऑगस्ट नंतर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. पण हवामान विभागाचा हा अंदाज देखील फोल ठरला आहे.

दरम्यान येत्या एक ते दोन दिवसात मुंबईत पावसाचा जोर वाढणार असे सांगितले जात आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार असल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई, ठाण्यासह उपनगरांच्या भागात येत्या 24 तासात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

निश्चितच येत्या काही तासांमध्ये मुंबईच हवामान बदलणार असल्याने आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात हळूहळू का होईना पावसाचा पुन्हा एकदा आगमन होईल, पुन्हा एकदा महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल आणि शेती पिकांना नवीन जीवदान मिळेल अशी आशा आता व्यक्त केली जाऊ लागली आहे. यामुळे हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरतो का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.