Maharashtra Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल पाहायला मिळत आहे. आता महाराष्ट्रासहित उत्तर भारतात जोरदार थंडीला सुरुवात झाली आहे.राज्यातील कमाल आणि किमान तापमानात हळूहळू घट होत आहे.
यामुळे रात्रीसं गुलाबी थंडीची जाणीव होऊ लागली आहे. राज्यातील विविध भागात सकाळी आणि संध्याकाळी थंड वातावरणाची अनुभूती येत आहे. देशातील काही भागात आता धुके पडण्यास सुरुवात झाली आहे. तर, काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस देखील सुरु आहे.
बंगालचा उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे सध्या देशातील काही भागांमध्ये जोराचा पाऊस पडत आहे. विशेष बाब म्हणजे आगामी चार दिवस देशातील काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा जोराचा पाऊस पडणार आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार, देशातील तामिळनाडू आणि केरळमध्ये 20 ते 23 नोव्हेंबर म्हणजेच आजपासून चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली आहे. तामिळनाडूमध्ये गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस बरसला आहे.
तसेच पुढील चार दिवस म्हणजे 20 ते 23 नोव्हेंबर दरम्यान तामिळनाडू आणि केरळमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. याशिवाय तटीय आंध्र प्रदेशात 21 नोव्हेंबरला आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात 22 आणि 23 नोव्हेंबरला पाऊस हजेरी लावणार आहे.
त्याच वेळी, तामिळनाडूमध्ये 22 आणि 23 नोव्हेंबर रोजी आणि केरळ आणि माहेमध्ये 22 आणि 23 नोव्हेंबर रोजी मुसळधार पाऊस होईल तर काही भागात अतिवृष्टी होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.
तसेच पुणे वेधशाळेने महाराष्ट्रातील काही भागात 24 नोव्हेंबर 2023 रोजी हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. 23 नोव्हेंबर पासून आग्नेय दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग वाढेल आणि याचा परिणाम म्हणून राज्यातील दक्षिण भागातील कमाल तापमान थोडेसे वाढणार आहे.
परिणामी 24 नोव्हेंबरला दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात हलका पाऊस पडेल असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.
यामुळे आता पुणे वेधशाळेचा हवामान अंदाज खरा ठरतो का आणि राज्यातील मध्य आणि दक्षिण भागात पाऊस बरसतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.