Maharashtra Havaman Andaj : राज्यासह देशातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. हवामानात होत असलेल्या बदलामुळे शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान होत आहे. अशातच आता पुन्हा एकदा महाराष्ट्रसह देशातील काही राज्यांमधील हवामानात बदल झाला आहे.
हवामान खात्याने महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. खरे तर राज्यात गेल्यावर्षीच्या शेवटी आणि या नवीन वर्षाच्या सुरुवातीला अवकाळी पावसाचे सावट पाहायला मिळाले आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे खूपच नुकसान झाले आहे. दरम्यान आता शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील पिके अंतिम टप्प्यात आली आहेत.
अशा परिस्थितीत आता जर अवकाळी पावसाची हजेरी लागली तर शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होईल आणि हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला जाईल अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे.
वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावाखाली देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, पंजाब आणि राजस्थानमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. येथे आज आणि उद्या हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज IMD ने दिला आहे.
सोबतच, उत्तर प्रदेशातही आज आणि उद्या पावसाची हजेरी राहील असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. तामिळनाडू आणि केरळमध्ये सुद्धा काही भागात मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळणार असा इशारा आयएमडी कडून देण्यात आला आहे.
शिवाय देशातील काही राज्यांमध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. जम्मू, काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या डोंगराळ भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि बर्फवृष्टी होईल असे IMD ने म्हटले आहे.
एवढेच नाही तर जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, चंदीगड, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान आणि पश्चिम राजस्थानमध्ये तसेच उत्तर मध्य प्रदेशात आज आणि उद्या गारपीट होईल असे देखील आय एम डी ने स्पष्ट केले आहे.
त्यामुळे संबंधित भागांमधील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना अधिक सावध राहण्याची आवश्यकता आहे. येथील शेतकऱ्यांनी गारपीटीची शक्यता लक्षात घेता रब्बी हंगामातील पिकांची विशेष काळजी घेतली पाहिजे.