आज कसं राहणार महाराष्ट्रातील हवामान ? अवकाळी पाऊस हजेरी लावणार का ? हवामान विभाग म्हणतंय…..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. गेल्या महिन्यात राज्यात ऑक्टोबर हिटचा प्रकोप पाहायला मिळाला होता. ऑक्टोबर हिटमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. दरम्यान या चालू महिन्याच्या अगदी सुरुवातीपासूनच राज्यातील तापमानात चढ उतार सुरू आहे.

राज्यातील कमाल आणि किमान तापमान सातत्याने बदलत आहे. सोबतच कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी देखील लागली आहे.

काल मुंबई, पुण्यासह कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसला आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने आज अर्थातच 11 नोव्हेंबर रोजी राज्यात कस हवामान राहणार, अवकाळी पाऊस हजेरी लावणार का ? याबाबत आपला नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तासात राज्यात राजधानी मुंबईसह पुणे, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. याशिवाय गोवा आणि उत्तर कर्नाटकात देखील आगामी काही तास पावसाची शक्यता कायम राहणार असा अंदाज आहे.

काही भागात जोरदार पाऊस बरसणार आहे तर काही ठिकाणी ढगाळ हवामान राहील असा अंदाज आहे. पुणे, सातारा, अहमदनगर, नासिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या संबंधित भागात आज हलका ते मध्यम पाऊस बरसणार असा अंदाज आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने या संबंधित भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

एकंदरीत आज राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून संबंधित भागातील नागरिकांना आज सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

पण सध्या सुरू असलेला अवकाळी पाऊस हा खरीप हंगामातील काढणीसाठी तयार झालेल्या पिकांसाठी घातक राहणार असे सांगितले जात आहे. मात्र या अवकाळी पावसाचा रब्बी हंगामासाठी फायदा होणार आहे. रब्बी हंगामातील पिकांसाठी हा पाऊस जीवनदान देणारा ठरेल अशी आशा या निमित्ताने व्यक्त होत आहे.

एकंदरीत या पावसामुळे काही शेतकऱ्यांना फायदा होणार आहे तर काही शेतकऱ्यांचे यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच यावर्षीची दिवाळी अवकाळी पावसातच साजरी करावी लागणार असल्याचे चित्र तयार होत आहे. 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा