Maharashtra Havaman Andaj : राज्यातील हवामानात सध्या मोठा बदल पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या आणि सकाळच्या तापमानात मोठी घट आली आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात आता गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. सकाळी आणि रात्रीच्या वेळी महाराष्ट्रात थंडीची चाहूल लागत आहे. मात्र असे असले तरी अजूनही राज्यातील विविध भागांमध्ये दुपारी उन्हाचे कडक चटके बसत आहे.
यामुळे सकाळी आणि रात्रीची थंडीही नागरिकांना हुडहुडी भरवण्यास असमर्थ ठरत आहे. दरम्यान नुकत्याच काही दिवसांपूर्वी भारतीय हवामान खात्याने यंदाच्या नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात कमाल आणि किमान तापमान सरासरीचा तुलनेत एक ते दोन अंश सेल्सिअसने अधिक राहणार असा अंदाज वर्तवला आहे.
यामुळे यंदा नोव्हेंबर महिन्यात थंडीची तीव्रता काहीशी कमी राहणार असे मत व्यक्त होत आहे. दरम्यान राज्यातील नागरिकांच्या माध्यमातून महाराष्ट्रात कडाक्याच्या थंडीला केव्हा सुरुवात होणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
यावर हवामान तज्ज्ञांच्या माध्यमातून आगामी काही दिवसात थंडी वाढेल विशेषता दिवाळी झाल्यानंतर थंडीचा जोर वाढू शकतो, असे मत व्यक्त होत आहे. अशातच राज्यात आता अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.
राज्यातील काही भागात थंडीचा जोर वाढणार आहे तर काही ठिकाणी पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आला असल्याने आगामी काही दिवस राज्यातील नागरिकांना मिश्र वातावरण अनुभवायला मिळणार आहे.
भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रसहित देशातील विविध भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. देशातील काही भागांमध्ये 12 नोव्हेंबर पर्यंत अर्थातच दीपावली पर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजे यंदा दिवाळीच्या काळात पाऊस बरसणार आहे.
विशेष म्हणजे या कालावधीमध्ये देशातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित भागातील नागरिकांना दिवाळीच्या काळात अधिक सजग आणि सतर्क राहणे अपेक्षित आहे.
महाराष्ट्रातील या भागात बरसणार जोराचा पाऊस
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्रात आणि कोकणात काही ठिकाणी जोराचा पाऊस बरसणार आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, आज भारतीय हवामान खात्याने केरळमधील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
खरतर गेल्या काही दिवसांपासून दक्षिण भारतात मुसळधार पाऊस सुरू आहे. विशेष म्हणजे 12 नोव्हेंबर पर्यंत भारताच्या दक्षिण द्वीपकल्पीय भागात मुसळधार पाऊस बरचण्याची शक्यता आहे. आज केरळमधील काही भागात मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसणार असा अंदाज आहे.
त्यामुळे संबंधित भागातील सर्वसामान्य नागरिकांना आणि शेतकऱ्यांना विशेष सावध राहण्याचा सल्ला यावेळी जाणकारांनी दिला आहे. राज्यात मात्र दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पाऊस पडणार आहे. पण या कालावधीमध्ये महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस बरसणार नाही असे देखील आय एम डी ने स्पष्ट केले आहे.