महाराष्ट्र हवामान अंदाज : राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता ! हवामान खात्याचा नवीन अंदाज काय सांगतोय ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Havaman Andaj : मान्सून 2023 आता अंतिम टप्प्यात आला आहे. दिल्ली, राजस्थान सारख्या बहुतांशी राज्यांमधून मान्सून माघारी फिरला आहे. तर काही राज्यांमधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. आपल्या राज्यातही 4 ऑक्टोबर नंतर मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता हवामान खात्याच्या तज्ञांनी वर्तवली आहे.

हवामान खात्याने राज्यातुन पाच ते दहा ऑक्टोबरच्या काळात मान्सून माघारी फिरणार असा दावा केला आहे. दरम्यान महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आणखी काही तास असाच बरससणार असल्याचे चित्र आहे. हवामान खात्याने आगामी काही दिवसाच्या हवामानाबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती दिली आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे राज्यात आज अर्थातच गांधी जयंतीच्या दिवशी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. गेल्या 24 तासात दक्षिण कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पावसाचे हजेरी लागली आहे. खरंतर राज्यात गणेशोत्सवापासून पावसाने मोठा जोर धरला आहे. गेल्या महिन्यात गणरायाच्या आगमना बरोबर महाराष्ट्रात दाखल झालेला पाऊस काल, रविवारी सुद्धा मुसळधार अन मनसोक्त बरसला आहे.

यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे यात शंकाच नाही. परंतु अजूनही राज्यात असे काही जिल्हे आहेत जिथे पावसाची मोठी तूट आहे. यामुळे तेथील शेतकऱ्यांची चिंता काही कमी झालेली नाही. अशातच मात्र हवामान खात्याने आज अर्थातच 2 ऑक्टोबर रोजी दक्षिण कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाच्या सरी कोसळणार असा अंदाज वर्तवला आहे.

कोकण किनारपट्टी आणि गोव्यात आजही जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे. कोकणातील दक्षिण भागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय उत्तर कोकणातील ठाणे जिल्ह्यातही आज काही ठिकाणी ढगाळ हवामान तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईमध्ये देखील आज काही ठिकाणी ढगाळ हवामान, हलका पाऊस तसेच काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान पावसाची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.