Maharashtra Havaman Andaj 2024 : महाराष्ट्रात गेल्या दहा दिवसांपासून वादळी पाऊस सुरू आहे. रोज कुठे ना कुठे वादळी पावसाची हजेरी लागत आहे. विशेष म्हणजे गेल्या दहा दिवसांच्या काळात राज्यातील काही भागांमध्ये गारपीट झाल्याची नोंदही करण्यात आली आहे. काही ठिकाणी वादळ देखील आले आहे. वादळामुळे राजधानी मुंबईत देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मुंबईत वादळ आल्याने होर्डिंग पडल्याची घटना घडली असून यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. काही लोक गंभीर जखमी झाले आहेत. शिवाय नागरिकांचे आर्थिक नुकसानही झाले आहे.
विशेष बाब म्हणजे गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेला वादळी पाऊस महाराष्ट्रात आणखी काही दिवस कायम राहणार असा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात 19 मे 2024 पर्यंत वादळी पावसाची शक्यता कायम राहणार आहे.
मराठवाडा विभागात 19 मे पर्यंत वादळी पाऊस बरसणार असा अंदाज देण्यात आला आहे. आज अर्थातच 17 मे 2024 ला राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकण, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशातील जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान आता आपण आयएमडीने कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिला आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या जिल्ह्यात बरसणार वादळी पाऊस?
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या अरबी समद्रात येमेनच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती पाहायला मिळतं आहे. तसेच मध्य प्रदेश आणि परिसरावर ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम असल्याचे पाहायला मिळतं आहे.
या साऱ्या घडामोडींमुळे सध्या राज्यात पूर्व मौसमी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे. हेच कारण आहे की गेल्या दहा दिवसांपासून अर्थातच 7 मे पासून राज्यात वादळी पाऊस सुरू आहे.
भारतीय हवामान विभागाने आज राज्यातील सिंधुदुर्ग, अहमदनगरनगर, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
विशेष म्हणजे या 16 जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला आहे. यामुळे सदर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
वादळी पावसाची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी आपल्या पशुधनाची देखील विशेष काळजी घ्यावी आणि पशुधन सुरक्षित ठिकाणी बांधावे असे आवाहन जाणकारांनी केले आहे.