महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जर आपण बघितले तर शेती आणि शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून फायद्याच्या ठरतील अशा अनेक योजना राबवल्या जात आहेत व या योजनांच्या माध्यमातून शेतीसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची उभारणी करण्याकरिता आर्थिक अनुदान शेतकऱ्यांना मिळते व या दृष्टिकोनातून शेतीक्षेत्राचा विकास होण्याकरिता खूप मोठी मदत होते.
सरकारच्या आपल्याला शेती क्षेत्राशी संबंधित बऱ्याच योजना सांगता येतील. परंतु या योजनांमध्ये शेतीला दिवसा विज पुरवठा होण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असलेली मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना देखील खूप महत्त्वाची अशी योजना आहे.
या योजनेचा उद्देश जर बघितला तर शेतकऱ्यांना शेतीकरिता दिवसा मोफत वीज उपलब्ध व्हावी आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी अखंडित सौरऊर्जेच्या माध्यमातून विजेची उपलब्धता होईल व त्या दृष्टिकोनातून ही योजना महत्त्वाची आहे.
त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या या योजनेच्या दुसरा टप्पा म्हणजे सौर कृषी वाहिनी योजना-2.0 ची घोषणा केली असून या सौर ऊर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी हरितक्रांती निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतील असा विश्वास देवेंद्र फडणीस यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेबद्दल दिली महत्त्वाची माहिती
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली असून त्यांनी म्हटले की या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज उपलब्ध करून देणे हा आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी निरंतर सौर ऊर्जा मिळेल. तसेच त्यांनी पुढे म्हटले की राज्यात सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना 16000 मेगा वॅट वीज देण्यात येते. गेल्या दोन वर्षांमध्ये सर्व फिडर सौर ऊर्जेत बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे.
व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सौर कृषी प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले व यामध्ये मुख्य सचिव सुजाता सैनिक, ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला, जलसंपदा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर आणि इतर अनेक वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमाला उंब्रठा आणि नारंगवाडी गावातील शेतकरी देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते. मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी वाशिम जिल्ह्यातील उंबरठा आणि धाराशिव जिल्ह्यातील नारंगवाडी येथील सौर कृषी प्रकल्पांचे उद्घाटन केले.
या अनुषंगाने सरकारच्या या योजनेकडे एक गेमचेंजर म्हणून बघितले जात आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करण्यात अग्रेसर बनवण्याच्या दिशेने प्रयत्न करत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे.