महाराष्ट्र राज्य सरकार ‘या’ विद्यार्थ्यांना देणार दरवर्षी 51 हजार रुपये ! तुमच्या मुला-मुलींना मिळणार का लाभ ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Government Scheme : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून शोषित, वंचित, गरीब आणि मागासवर्गीय नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना चालवल्या जात आहेत. राज्य शासनाने देशातील शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, असंघटित कामगारांसाठी, विद्यार्थ्यांसाठी महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत.

यामध्ये राज्यातील गरीब विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दरवर्षी 51 हजार रुपये मदत दिली जात आहे. दहावी, बारावी, पदविका आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून ही मदत पुरवली जात आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळत असून त्यांचे शिक्षण पैशाअभावी खंडित राहत नाहीये. यामुळे या योजनेचे समाजातील सर्वच स्तरावरून कौतुक केले जात आहे. दरम्यान आज आपण या महाराष्ट्र स्वाधार योजनेअंतर्गत कोणत्या विद्यार्थ्यांना लाभ मिळतो आणि हा लाभ कशासाठी दिला जातो याबाबत थोडक्यात पण सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या विद्यार्थ्यांना मिळतो लाभ

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील ज्या विद्यार्थ्यांची शासकीय वस्तीगृहात सोय होत नाही अशा पात्रता धारक विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना राज्याच्या समाज कल्याण विभागामार्फत राबवली जात आहे.

या योजनेच्या माध्यमातून शासकीय वस्तीगृहात पात्रता असूनही ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही त्या विद्यार्थ्यांना शासनाकडून बोर्डिंग, निवास आणि इतर खर्चासाठी 51 हजार रुपयांची दरवर्षी आर्थिक मदत दिली जात आहे.

स्वाधार योजनेअंतर्गत किती मदत मिळते

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या स्वाधार योजनेअंतर्गत राज्यातील दहावी, बारावी, पदवी, पदविका आणि व्यवसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बोर्डिंग सुविधा म्हणून 28,000 रुपये, निवास सुविधा म्हणून 15,000 रुपये, विविध खर्च म्हणून 8,000 रुपये, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे विद्यार्थ्यास अतिरिक्त 5,000 रुपये आणि इतर शाखेतील विद्यार्थ्यास अतिरिक्त 2,000 रुपये असे एकूण 51 हजार रुपयाची मदत शासनाच्या माध्यमातून पुरवली जात आहे.

योजनेसाठी आवश्यक पात्रता

महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी यासाठी पात्र राहणार आहेत.

या योजनेचा लाभ हा केवळ अनुसूचित जाती आणि नव बौद्ध प्रवर्गातील म्हणजेच एससी अर्थातच शेड्युल कास्ट प्रवर्गातील विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.

ज्या विद्यार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे असेच विद्यार्थी यासाठी पात्र राहतील.

दहावी तसेच बारावीनंतरच्या दोन वर्षासाठीच्या अभ्यासक्रमासाठी या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे.

विद्यार्थ्याला या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी मागील इयत्तेत किमान 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यास मात्र मागील इयत्तामध्ये 40% किंवा त्यापेक्षा अधिक गुण असणे आवश्यक आहे.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

या योजनेसाठी अर्ज करताना अर्जदार विद्यार्थ्याला आधार कार्ड, आधार कार्डशी लिंक असलेले बँक खाते, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट आकाराचा फोटो, ओळखपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, ही योजना एस सी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असल्याने जात प्रमाणपत्र अशी काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.

अर्ज कुठे करावा लागणार

यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. विहित नमुन्यांमध्ये अर्ज सादर करावा लागणार असून हा विविध नमुना अर्ज राज्य शासनाच्या सामाजिक कल्याण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर मिळून जाईल.

समाज कल्याण विभागाच्या संकेतस्थळावरून अर्ज डाऊनलोड करून त्याची प्रिंट आऊट घेतल्यानंतर हा अर्ज काळजीपूर्वक भरायचा आहे. अर्ज भरल्यानंतर हा अर्ज समाज कल्याण विभागाकडे सबमिट करायचा आहे. अर्ज सबमिट झाल्यानंतर यासाठी पात्र विद्यार्थ्यांना मग शासनाकडून मदत पुरवली जाणार आहे.