Maharashtra Government Scheme : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. यामध्ये महिलांसाठी देखील अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. विधवा महिलांना आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे यासाठी देखील महाराष्ट्र राज्य शासनाने एक विशेष योजना सुरू केली आहे.
विधवा निराधार महिलांना स्वावलंबी आयुष्यात जगता यावे यासाठी प्रयत्नशील असलेल्या महाराष्ट्र राज्य शासनाने एक अशी योजना सुरू केली आहे ज्या अंतर्गत विधवा महिलांना दर महिना एक ठराविक रक्कम दिली जात आहे. यामुळे विधवा महिलांचे आयुष्य सुखकर बनले आहे.
दरम्यान आज आपण याच योजनेची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या योजनेचा लाभ कोणत्या विधवा महिलांना होतो, या अंतर्गत किती रुपयांचा लाभ मिळतो, यासाठी अर्ज कुठे करावा लागणार, याबाबतची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणती आहे ती योजना
आम्ही ज्या योजनेबाबत बोलत आहोत ती योजना आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना. ही योजना महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून राबवली जात आहे.
या योजनेचा राज्यातील विधवा महिलांना लाभ मिळत आहेत. या अंतर्गत महिलांना दरमहिना 1500 रुपयांचा आर्थिक लाभ दिला जात आहे. यामुळे विधवा महिलांचे आयुष्य सुखकर बनले आहे.
कोणत्या विधवा महिलांना मिळतो लाभ ?
या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील लाभार्थ्यांना मिळतो. ज्या विधवा महिला दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातून येतात अर्थातच BPL म्हणजे बिलो पॉव्हर्टी लाईन कुटुंबात येतात अशांना या योजनेचा लाभ दिला जात आहे.
म्हणजे सर्वच विधवा महिलांना याचा लाभ मिळू शकणार नाही. फक्त दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातल्या गरजू विधवा महिलांना या योजनेअंतर्गत 1500 रुपये प्रति महिना एवढा लाख दिला जाणार आहे.
कोण-कोणती कागदपत्रे लागतात ?
या योजनेसाठी अर्ज करताना काही आवश्यक कागदपत्रे देखील जमा करावी लागतात. योजनेसाठी अर्ज करताना विहीत नमुन्यातील अर्ज भरायचा आहे. तसेच
वयाचा दाखला – (40 ते 70 वर्ष), विधवा महिला अर्जदाराकरीता पतीचा मृत्यु दाखला व मोठ्या मुलाचा वयाचा दाखला, किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा दाखला, आधार कार्ड, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स, रहिवासी दाखला, अर्जदाराचा फोटो ही कागदपत्रे आवश्यक असतात.
अर्ज कुठे करावा लागणार
यासाठी पात्र लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयात अर्ज करायचा आहे. तहसील कार्यालयातील सेतू केंद्रात या योजनेसाठी अर्ज सादर करता येतो. तसेच या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज देखील सादर करता येतो. https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Certificate या संकेतस्थळावर जाऊन इच्छुकांना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.