Maharashtra Government Scheme : येत्या काही महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी वर्तमान सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शिंदे सरकारने राज्यातील सर्वच रेशन कार्डधारकांना आता पाच लाख रुपयांपर्यंतचा मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला आहे.
आता राज्यातील पिवळे, अंत्योदय, केशरी रेशन कार्ड धारकांसमवेतच पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना देखील प्रत्येक वर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचा मोफत उपचार मिळणार आहे. आधी पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना याचा लाभ मिळत नव्हता.
पण आता या रेशन कार्डधारकांना देखील याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना निश्चितच मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, सरकारच्या या निर्णयाचे राज्यातील सर्वसामान्यांच्या माध्यमातून कौतुक केले जात आहे.
राज्य शासनाने हा निर्णय घेतल्यानंतर आता महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढली आहे. राज्यातील जवळपास सर्वच रेशन कार्डधारकांना याचा लाभ मिळणार असल्याने ही लाभार्थी संख्या 9 कोटी 62 लाख 7 हजार 743 एवढी झाली आहे.
कोणत्या आजारावर मिळणार मोफत उपचार?
या योजनेच्या माध्यमातून कर्करोग, ह्दयरोग, शस्त्रक्रिया, सांधेदुखी अशा विविध आजारांवर पाच लाख रुपयांपर्यंतचा मोफत उपचार मिळणार आहे. जवळपास 1 हजार 300 आजारांवर या योजनेअंतर्गत मोफत उपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत. याच्या लाभासाठी रेशन कार्ड आणि वय अधिवास प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे.
यासाठी नागरीकांना गोल्डन आयुष्मान कार्ड काढावे लागणार आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील तब्बल 1900 दवाखान्यांमध्ये नागरिकांना मोफत उपचाराची सुविधा मिळणार आहे. दरम्यान, आता आपण या दवाखान्यांची यादी नेमकी कुठे पाहायची याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
दवाखान्यांची यादी कुठे पाहणार
या योजनेअंतर्गत मोफत उपचाराचा लाभ फक्त योजनेशी संलग्नित असणाऱ्या दवाखान्यातच मिळणार आहे. अशा परिस्थितीत या योजनेची संलग्नित असणाऱ्या दवाखान्यांची यादी पाहण्यासाठी https://www.jeevandayee.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे.
या अधिकृत संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर तुम्हाला नेटवर्क हॉस्पिटल या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला ज्या जिल्ह्यातील दवाखान्यांची यादी बघायची आहे त्या जिल्ह्याच्या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्ही निवडलेल्या जिल्ह्यातील या योजनेशी संबंधित सर्व दवाखान्यांची यादी तुमच्या समोर ओपन होणार आहे.
या दवाखान्यात विविध आजारांवर पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत केले जाणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारने घेतलेला हा निर्णय राज्यातील सर्वच नागरिकांसाठी मोठा फायदेशीर ठरणार आहे.