Maharashtra Government Scheme : काल केंद्रातील मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अंतरीम बजेट सादर केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन जी यांनी सहाव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला.
यावेळी या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या. अर्थसंकल्पानंतर लगेचच लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे.
देशाच्या विकासात मोलाची भूमिका निभावणाऱ्या महाराष्ट्राला देखील या बजेटमध्ये काही लाभ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. देशाच्या एकात्मिक विकासाचे आपले महाराष्ट्र एका प्रकारे ग्रोथ इंजन म्हणून काम करते.
यामुळे या ग्रोथ इंजिनची ग्रोथ घडवून आणणे देखील आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर आपल्या महाराष्ट्रासाठी अंतरिम अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे.
या अंतरिम बजेटमध्ये महाराष्ट्रातील सात शहरांमध्ये नागरिकांना प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा लाभ देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
खरे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी 2024 ला अर्थातच प्रभू श्री रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत देशभरात सोलार रूफ टॉप बसवले जाणार आहेत.
दरम्यान ही योजना आपल्या महाराष्ट्रात देखील राबवली जाणार आहे. राज्यातील पुणे, नासिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अकोला, नांदेड, लातूर या शहरांमध्ये ही योजना राबवली जाणार आहे.
या बाबतची घोषणा काल सादर झालेल्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. या अंतर्गत या शहरात प्रत्येकी 25 हजार सोलर रूफ टॉप बसवले जाणार अशी माहिती समोर आली आहे.
मार्च 2024 अखेरपर्यंत वर नमूद केलेल्या सात शहरांमध्ये प्रत्येकी 25000 सोलर रूफ टॉप बसवण्याचे उद्दिष्टे ठेवण्यात आले असल्याची माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून समोर आली आहे.
यामुळे या सदर शहरांमधील सर्वसामान्य नागरिकांना वीज बिलाच्या कचाट्यातून बाहेर काढता येणार आहे. यामुळे या संबंधित शहरांमधील सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार अशी आशा आता व्यक्त होऊ लागली आहे.