Maharashtra Gharkul Anudan Yojana : महाराष्ट्र राज्यातील नागरिकांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहेत. गरजू नागरिकांसाठी घरकुल योजना देखील सुरू आहेत. ज्या लोकांना स्वतःचे हक्काचे घर नाही अशा नागरिकांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून घरकुल योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून राज्यातील गरजवंत नागरिकांना हक्काचे घर उपलब्ध होत आहे.
या योजनांमुळे अनेक बेघर लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. शासनाच्या माध्यमातून राज्यातील विविध प्रवर्गातील नागरिकांसाठी घरकुल योजना राबवल्या जात आहेत. महाराष्ट्रातील अपंग नागरिकांसाठी देखील विशेष घरकुल योजना राबवली जाते.
दरम्यान याच घरकुल योजने संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ती म्हणजे या योजनेसाठी अर्ज सुरू झाले आहेत. यामुळे पात्र लाभार्थ्यांनी अधिका अधिक अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील अपंग नागरिकांना विनाअट घरकुल उपलब्ध करून दिले जात आहे. यासाठी एक लाख वीस हजार रुपयांचे अनुदान शासनाकडून दिले जाते. दरम्यान आता आपण या योजनेचे स्वरूप आणि यासाठी अर्ज कसा करायचा याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
कोणती आहे ही योजना ?
जिल्हा परिषदेच्या सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाच्या माध्यमातून ही योजना राबवली जात आहे. या अंतर्गत अपंग व्यक्तींना एक लाख वीस हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. या योजनेसाठी केवळ अपंग व्यक्तीच अर्ज करू शकणार आहेत. एक लाख रुपयांच्या आत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या पात्र नागरिकांना या योजनेअंतर्गत घरकुल मिळणार आहे.
अर्ज कुठे करावा ?
ही योजना जिल्हा परिषदेच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून राबवली जात असल्याने या योजनेसाठी पंचायत समितीमध्ये अर्ज करावा लागणार आहे. पंचायत समितीमध्ये जाऊन गट विकास अधिकारी यांच्याकडे हा अर्ज करावा लागणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण कोणते कागदपत्रे द्यावे लागतात?
https://drive.google.com/file/d/11T9149vYnNludOAPY3CtWvh7Exx_9ejt/view?usp=drivesdk या लिंक वर दिलेला अर्ज काळजीपूर्वक भरून त्यावर फोटो लावून अर्ज पंचायत समितीमध्ये सादर करावा. अर्ज सादर करताना काही कागदपत्रे देखील द्यावी लागणार आहेत.
यामध्ये रहिवासी दाखला, अपंगत्वाचा दाखला, अद्याप घरकुलाचा लाभ मिळाला नसल्याचा दाखला, अर्जदाराचा आधार कार्ड, अर्जदाराचे सदस्य शासकीय योजनेत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, अर्जदाराच्या नावावर जागा असणे आवश्यक आहे, उत्पन्नाचे प्रमाणपत्र अशा काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.
कोणत्या जिल्ह्यात सुरू आहे ही योजना ?
ही योजना महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. मात्र प्रत्येक जिल्ह्यात अर्ज स्वीकारण्याचा कालावधी बदलत असतो. सध्या छत्रपती संभाजीनगर म्हणजेच पूर्वीचे औरंगाबाद जिल्ह्यात या योजनेसाठी अर्ज स्वीकारणे सुरू आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील या योजनेसाठी पात्र नागरिकांना 15 जुलै पर्यंत अर्ज करता येणार आहेत.