Maharashtra Gas Cylinder New Price : पुढल्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. तसेच आपल्या महाराष्ट्रासह देशातील काही राज्यात विधानसभा निवडणुकीचा देखील कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने पुढील वर्षी, 2024 मध्ये लोकसभा निवडणुका घेणार असल्याचे संकेत दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर आता सरकारकडून सर्वसामान्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्वसामान्य नागरिक गेल्या काही वर्षांपासून वाढत्या महागाईमुळे त्रस्त झाले आहेत. वाढत्या महागाईने होरपळलेली जनता मोदी सरकार विरोधात नाराजी व्यक्त करत आहे. जाणकार लोकांनी लोकसभेच्या निवडणुकीत महागाईचा मुद्दा चांगलाच गाजू शकतो आणि हा मुद्दा निवडणुकीचे निकाल ठरवू शकतो असे सांगितले आहे.
अशा स्थितीत केंद्रातील मोदी सरकारने आता सर्वसामान्यांना महागाईतून दिलासा देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येवर अर्थातच काल एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार आता देशभरातील उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 200 रुपयांनी गॅस सिलेंडर स्वस्त मिळणार आहे.
उज्वला योजनेचे देशभरात दहा कोटी लाभार्थी आहेत. अशा स्थितीत या दहा कोटी लोकांसाठी नरेंद्र मोदी सरकारचा हा निर्णय मोठा दिलासादायक ठरणार असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान सरकारने जाहीर केलेली ही दर कपात केव्हापासून लागू होणार हा प्रश्न सर्वसामान्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
अशा स्थितीत आज आपण हा निर्णय केव्हापासून लागू होणार आणि आपल्या महाराष्ट्रात जिल्ह्यानुसार आता सिलेंडरच्या किमती किती राहणार याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
केव्हापासून लागू होणार हा निर्णय
वास्तविक सध्या उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर साठी 200 रुपयांची सबसिडी पुरवली जात आहे. आता अतिरिक्त दोनशे रुपयांची सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच आता उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तब्बल 400 रुपयांनी गॅस सिलेंडर स्वस्त मिळणार आहे. दरम्यान या निर्णयाची अंमलबजावणी येत्या महिन्यापासून म्हणजेच एक सप्टेंबर 2023 पासून होणार आहे.
तुमच्या जिल्ह्यात किती रुपयाला मिळणार सिलेंडर?
- मुंबई- ९०२.५० रुपये
- पुणे – ९०६ रुपये
- ठाणे – ९०२.५० रुपये
- नागपूर – ९५४.५० रुपये
- छत्रपती संभाजीनगर – ९११.५० रुपये
- अहमदनगर – ९१६.५० रुपये
- अकोला- ९२३ रुपये
- अमरावती- ९३६.५० रुपये
- भंडारा – ९६३ रुपये
- बीड- ९२८.५० रुपये
- बुलडाणा – ९१७.५० रुपये
- चंद्रपूर – ९५१.५० रुपये
- धुळे- ९२३ रुपये
- गडचिरोली – ९७२.५० रुपये
- गोंदिया – ९७१.५० रुपये
- हिंगोली – ९२८.५० रुपये
- जळगाव – ९०८.५० रुपये
- जालना – ९११.५० रुपये
- कोल्हापूर – ९०५.५० रुपये
- लातूर – ९२७.५० रुपये
- नांदेड – ९२८.५० रुपये
- नंदूरबार – ९१५.५० रुपये
- नाशिक – ९०६.५० रुपये
- धाराशिव – ९२७.५० रुपये
- पालघर – ९१४.५० रुपये
- परभणी – ९२९ रुपये
- रायगड – ९१३.५० रुपये
- रत्नागिरी- ९१७.५० रुपये
- सांगली – ९०५.५० रुपये
- सिंधुदुर्ग – ९१७ रुपये
- सोलापूर – ९१८.५० रुपये
- वर्धा – ९६३ रुपये
- वाशिम – ९२३ रुपये
- यवतमाळ – ९४४.५० रुपये