Maharashtra Flower Price :- परतीच्या पावसाने फुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने फुलांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत फुलांचे दर दुप्पट झाले आहेत. पिवळा झेंडू २००, तर निशिगंध ५५० रुपये किलो झाला आहे.
दसरा, दिवाळी डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांनी झेंडूची लागण केली. मात्र, ढगफुटीसारख्या पावसाने फुलशेतीची मोठी हानी झाली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीमध्ये फुलांची टंचाई भासत असून, त्यामुळे फुलांचे भाव वाढले आहेत.
दसयाच्या तुलनेत फुलांच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. पिवळा व भगवा झेंडू त्यावेळी शंभर रुपये किलो होता. मात्र, आता दोनशे रुपये किलोपर्यंत भाव पोहोचला आहे. किरकोळ बाजारात यापेक्षा अधिक दर असून ७५ रुपये पावकिलो या दराने विक्री सुरु आहे.
हिंगोलीत मात्र भाव गडगडले…
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ शहरात दीपावली लक्ष्मीपूजनाच्या अनुषंगाने शेतकयांनी मोठ्या प्रमाणात झेंडू फुले बाजारात विक्रीसाठी आणली; परंतु फुलांचा भाव अचानक गडगडल्याने २५ रुपये किलो दराने शेतकऱ्यांना विकावी लागले.
फुलांचा दर (प्रतिकिलो)
■ पिवळा झेंडू २००
■ भगवा झेंडू – २००
■ निशिगंध ५५०
■ शेवंती २००
■ गलाटा २००
■ गुलाब ४०
(दहा फुलांची पेंढी)
■ कमलफूल – १०
हारांच्या दरातही वाढ
फुलांचे दर वाढल्याने हारांच्या दरातही वाढ झालीआहे. फोटोसाठी लागणारा झेंडूचा हार ६० रुपये, निशिगंधचा ८०, तर मोठा १२५ ते १३० रुपये आहे.