रानावनात आढळणाऱ्या करवंद शेतीचा यशस्वी प्रयोग ! 8 एकरात 16 लाखांचे उत्पन्न, मराठमोळ्या शेतकऱ्याने अखेर करून दाखवले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Farmer Success Story : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून सातत्याने नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. विशेषता मराठवाड्यातील शेतकऱ्यांना निसर्गाशी नेहमीच दोन हात करून शेती व्यवसाय करावा लागतोय. मराठवाडा म्हणजेच दुष्काळ अशी परिस्थिती पाहायला मिळाली आहे.

मराठवाडा आणि दुष्काळ हे एकमेकांना पूरकa आहेत. गेल्या तीन वर्षात संपूर्ण राज्यभरात चांगला पाऊस झाला असल्याने मराठवाड्यातील दुष्काळाची ही स्थिती गेल्या तीन वर्षात बदलली होती मात्र यंदा पुन्हा एकदा मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट पाहायला मिळत आहे. दरम्यान या दुष्काळी पट्ट्यात शेती फुलवणे हेच मोठे आव्हानात्मक काम आहे. मात्र सोपे काम करणे हे शेतकऱ्याच्या स्वभावाला धरून नाही.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यामुळे दुष्काळासारख्या खडतर आव्हानावर यशस्वीरीत्या मात करत मराठवाड्यातील शेतकरी आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून संपूर्ण राज्याला दिशा दाखवण्याचे काम करत आहेत. दरम्यान मराठवाड्याच्या हिंगोली जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने रानावनात आढळणाऱ्या करवंद लागवडीतून लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे.

जिल्ह्यातील कांडली येथील मधुकर पानपट्टे यांनी आठ एकर जमिनीत करवंद लागवड करून तब्बल 15 ते 16 लाख रुपयांचे उत्पन्न कमावण्याची किमया साधली आहे. यामुळे सध्या पानपट्टे यांचा हा प्रयोग संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात असं म्हणण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे.

मधुकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या त्यांना करवंद शेतीतून लाखो रुपयांची कमाई होत आहे. परंतु बारा वर्षांपूर्वी परिस्थिती काही औरच होती. बारा वर्षांपूर्वी ते पारंपारिक शेती करत. या पारंपारिक शेतीमध्ये मात्र त्यांची जमीन हलकी असल्याने फारसे उत्पन्न मिळत नव्हते.

शिवाय वन्य प्राण्यांमुळे त्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत असत. अशा परिस्थितीत उत्पादन खर्च अधिक आणि मिळणारे उत्पादन कमी यामुळे उत्पादन आणि उत्पन्न याचे सांगड त्यांना घालता येत नव्हती. शेतीमधून मिळणारे उत्पन्न हे खूपच कमी होत होते.

दिवसेंदिवस महागाई आकाशाला गवसणी घालत होती आणि शेतीमधून मिळणारे उत्पन्न तेवढ्याच गतीने कमी होत होते. अशा परिस्थितीत त्यांनी बारा वर्षांपूर्वी शेतीमध्ये बदल स्वीकारला आणि सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर दोन एकर जमिनीवर करवंद लागवडीचा प्रयोग केला.

प्रायोगिक तत्त्वावरील हा प्रयोग त्यांच्या योग्य नियोजनामुळे आणि अमाप कष्टांमुळे सक्सेसफुल ठरला. यामुळे त्यांनी करवंद शेतीचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला. यानुसार त्यांनी टप्प्याटप्प्याने करवंद लागवड वाढवली आणि आता त्यांनी 30 एकर जमिनीवर करवंदाची लागवड केली आहे.

यापैकी आठ एकर जमिनीवरील करवंद हार्वेस्टिंगसाठी तयार झाले असून यातून त्यांना तब्बल 15 ते 16 लाख रुपये उत्पन्न मिळण्याची अशी आहे. करवंद हलक्या जमिनीवर देखील चांगले फुलत असल्याने त्यांनी करवंद लागवडीचा निर्णय घेतला होता आणि आज हा निर्णय त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला आहे.

या शेतीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे करवंद रोपांसाठी त्यांना एकदा खर्च करावा लागतो यानंतर या शेतीसाठी फारसा खर्च लागत नाही. तसेच करवंद लागवड केल्यानंतर अवघ्या तीन वर्षात यातून उत्पादन मिळण्यास सुरुवात होते.

एकंदरीत रानावनात आढळणारे करवंद व्यावसायिकरीत्या फुलवून याची यशस्वी शेती करत मराठवाड्यातील या शेतकऱ्याने लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवत चांगल्या-चांगल्या प्रयोगशील शेतकऱ्यांना देखील लाजवले आहे. सध्या मधुकररावांचा हा प्रयोग चांगलाच चर्चेला आला असून हा प्रयोग इतरांसाठी देखील मार्गदर्शक राहणार आहे यात शंकाच नाही.