Maharashtra Farmer Scheme : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना ही देखील अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केली असून या योजनेत नुकताच एक महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
या योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली असून याचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. खरे तर राज्य शासनाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
महिलांसाठी आत्तापर्यंत राज्य शासनाने शेकडो योजना सुरू केल्या आहेत. दरम्यान महिला शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत अधिकचे महत्व मिळावे यासाठी या योजनेमध्ये काही बदल झालेले आहेत.
या नवीन बदलानुसार आता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या पत्नीचे बाळंतपणात जर मृत्यू झाला तर सदर महिला शेतकऱ्यांच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांची मदत देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
खरे तर या योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचा अपघाताने मृत्यू झाला किंवा अपंगत्व आले तर सदर मयत शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली जात आहे.
दरम्यान आता या योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली असून महिला शेतकऱ्याचा जर बाळंतपणात मृत्यू झाला तर त्या मयत महिलेच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांची मदत मिळणार आहे. या योजनेअंतर्गत आर्थिक मदतीचा लाभ मिळवण्यासाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा लागतो.
कुठं करणार अर्ज
या गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अपघात घडल्याच्या 30 दिवसांच्या आत प्रस्ताव सादर करावा लागतो. प्रस्ताव सादर करताना काही महत्त्वाची कागदपत्रे सदर अपघात ग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या वारसदारांना सादर करावी लागतात.
अपघात विमा योजनेचा लाभ मिळावा यासाठी ७/१२ उतारा, मृत्यूचा दाखला, शेतकऱ्यांचे वारस म्हणून गाव कामगार तलाठ्याकडील गाव नमुना सहा (क) नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झालेला अहवाल (एफआयआर), स्थळ पंचनामा, पोलीस पाटील माहिती अहवाल यांसारखे महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागतात.
या योजनेच्या लाभासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे घेऊन संबंधित कृषी अधिकारी कार्यालयात याचा सविस्तर असा प्रस्ताव सादर करावा लागतो. प्रस्ताव सादर केल्यानंतर मग सदर अपघात घडलेल्या शेतकरी कुटुंबाच्या वारसांना मदत दिली जात असते.