शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! वैयक्तिक शेततळ्यासाठी अर्ज सुरू झालेत, ‘या’ संकेतस्थळावर सादर करता येणारा अर्ज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Farmer Scheme : शेती व्यवसायात पाणी हा एक महत्त्वाचा घटक आहे. पाण्याविना शेती करणे म्हणजे अशक्य आहे. जर पाण्याची शाश्वत उपलब्धता नसेल तर शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित असे उत्पादन मिळवता येत नाही. जर पावसाळ्यात चांगला पाऊस झाला नाही तर रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पिकांना शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध नसते.

अशा परिस्थितीत जर शेतकऱ्यांनी शेततळे बनवले तर शेततळ्यात पाणी साठवून ठेवून या पाण्याचा वापर रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी केला जातो. शेततळ्यामुळे रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पिकांना शाश्वत पाणी उपलब्ध राहते तसेच भाजीपाला आणि फळबाग पिकांसाठी देखील यामुळे शाश्वत पाण्याची सोय होते.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अर्थातच शेततळे असले तर शेतकऱ्यांना शेतीमधून शाश्वत उत्पन्न मिळवता येते. मात्र असे असले तरी शेततळे बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना खर्च करावा लागतो. हा खर्च प्रत्येकच शेतकऱ्याला पेलला जातो असे नाही. त्यामुळे पैसे अभावी शेतकऱ्यांना शाश्वत पाण्यासाठी शेततळ्याची व्यवस्था करता येत नाही.

शेतकऱ्यांची ही अडचण ओळखून शासनाच्या माध्यमातून शेततळे बनवण्यासाठी अनुदान पुरवले जात आहे. मुख्यमंत्री कृषी शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळ्यासाठी 75 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जात आहे. दरम्यान आता या योजनेबाबत एक महत्त्वाची माहिती हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वैयक्तिक शेततळ्याला अनुदान मिळवण्यासाठी अर्ज सुरू झाले आहेत.

कृषी विभागाने शेतकऱ्यांकडून वैयक्तिक शेततळ्यासाठी अर्ज मागविले आहेत. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारच्या संकेतस्थळावर जाऊन यासाठी अर्ज सादर करता येणार आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना अधिका-अधिक अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे आज आपण या योजनेसाठी अर्ज कुठे करता येणार आहे याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.

किती अनुदान मिळणार

वैयक्तिक शेततळ्यासाठी आकारमानानुसार शासनाकडून अनुदान दिले जाते. पूर्वी शेततळ्यासाठी 50,000 पर्यंतचे अनुदान मिळत होते मात्र आता यामध्ये 25 हजाराची वाढ झाली असून आता शेततळ्यासाठी 75 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाते. आकारमानानुसार आता शेतकऱ्यांना 28 हजार रुपयांपासून ते 75 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान या योजनेच्या माध्यमातून मिळत आहे.

योजनेच्या लाभासाठी आवश्यक पात्रता

या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील रहिवाशांना दिला जात आहे. याचा लाभ केवळ आणि केवळ शेतकऱ्यांनाच मिळतो. तसेच याच्या लाभासाठी शेतकऱ्याकडे किमान 0.60 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्याकडे शेततळ्यासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य जमीन असणे गरजेचे आहे. तसेच याचा लाभ घेण्यासाठी आधी शेतकऱ्यांनी कोणत्याच शेततळे योजनेचा लाभ घेतलेला नसावा ही अट आहे.

अर्ज कुठे करावा लागणार

शेततळ्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावा लागतो. आतापर्यंत शेततळ्यासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांमधुन लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड होत असे. पण आता लॉटरी पद्धत बंद झाली असून ज्या शेतकऱ्यांना शेततळ्याची गरज आहे त्यांना सर्वांनाच टप्प्याटप्प्याने अनुदान पुरवले जाणार आहे. सध्या शेततळ्यासाठी कृषी विभागाकडून अर्ज मागवले जात असून यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा असे आवाहन केले जात आहे.

कोण कोणती कागदपत्रे लागणार

या योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांना काही आवश्यक डॉक्युमेंटची पूर्तता करावी लागते. अर्जदार शेतकऱ्यांना जमीनीचा सात-बारा आणि 8-अ उतारा, आधारकार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स, हमीपत्र आणि जातीचा दाखला ( जातीचा दाखला मागासवर्गीय प्रवर्गातील अर्जदार शेतकऱ्यांना सादर करावा लागतो)