Maharashtra Farmer : दिवाळीच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर, गेल्या काही वर्षापासून हवामानाचा लहरीपणा शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ठरत आहे. पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. दरम्यान सप्टेंबर महिन्यातही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे पावसाच्या लहरीपणाने मोठे नुकसान झाले.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या संततधार मुसळधार पावसाने मराठवाडा विभागातील काही जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. लातूर जिल्ह्याबाबत बोलायचं झालं तर जिल्ह्यातील खरिपातील २ लाख ८२ हजार ४५८ हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले होते.
दरम्यान, या नुकसान भरपाईचे पंचनामे होऊन भरपाईपोटी निधीही मंजूर करण्यात आला होता. यामुळे शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेले ही नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यात कधीपर्यंत जमा होणार हा मोठा सवाल होता. मात्र याच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठी भेट मिळाली आहे.
कारण की गेल्या चार दिवसांपासून शासनाकडून मंजूर झालेली ही नुकसान भरपाईची रक्कम आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होऊ लागली आहे. यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होईल आणि या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे.
खरे तर समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामातुन शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची आणि उत्पन्नाची आशा होती. मात्र सप्टेंबर महिन्यात झालेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या या मनसुब्यावर पाणी फेरले गेले. लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अगदीच हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला.
दरम्यान संततधार पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची प्रशासनाकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. पंचनामे केले गेलेत. पंचनामे झाल्यानंतर सदर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या अनुषंगाने प्रशासनाने त्याचा अहवाल शासनाकडे पाठविला होता.
दरम्यान प्रशासनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासनाच्या माध्यमातून सदर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मंजूर करण्यात आली. राज्य सरकारने नुकसान भरपाईपोटी ३८४ कोटी १४ लाख मंजूर केले होते.
दरम्यान, आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेली हीच 384 कोटी रुपयांची नुकसान भरपाईची रक्कम आता पात्र नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे लातूर जिल्ह्यातील या संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे.