Maharashtra Famous Tourist Spot : महाराष्ट्राला अप्रतिम असे भौगोलिक आणि नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. आपल्या राज्यात अशी अनेक नैसर्गिक सौंदर्याने नटलेली पर्यटन स्थळे आहेत जी संपूर्ण जगात प्रसिद्ध बनलीयेत. ही प्रसिद्ध पर्यटन स्थळे पाहण्यासाठी जगभरातून लाखो पर्यटक आपल्या राज्यात हजेरी लावतात.
या पर्यटन स्थळांमध्ये लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, पाचगणी अशा विविध ठिकाणांचा समावेश होतो. या पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी दरवर्षी लाखों पर्यटक आपल्या राज्यात येतात आणि आपली ट्रिप एन्जॉय करतात. मात्र आज आपण महाराष्ट्रातील अशा एका पर्यटन स्थळाविषयी जाणून घेणार आहोत जे विदेशातील पर्यटन स्थळांना देखील मात देण्यास सक्षम आहे.
या पर्यटन स्थळाला भेट दिल्यानंतर तुम्ही मालदीव आणि स्वित्झर्लंडला सुद्धा विसरून जाल. हो बरोबर ऐकताय तुम्ही, मालदीव आणि स्वित्झर्लंड मध्ये जाऊन तेथील बीचवर भटकंती करण्याऐवजी तुम्ही आपल्या राज्यातील मालवण बीचवर एकदा भेट देऊन पहा तुम्हाला मालदीव आणि स्वित्झर्लंड फिरल्यासारखेच वाटेल.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्राच्या काठावर वसलेले मालवण हे खूपच सुंदर आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेले ठिकाण आहे. मालवणला लाभलेला स्वच्छ समुद्र किनारा पर्यटकांना खूपच मोहत आहे. पर्यटक मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावर मनमुराद असा आनंद लुटतात.
जर तुम्हीही कुठे फिरण्याचा प्लॅन बनवत असाल तर मालवणला एकदा नक्कीच भेट दिली पाहिजे. जर तुम्ही कोकणात फिरण्याचा प्लॅन बनवत असाल तर मालवणला भेट दिलीच पाहिजे. मालवण बीचचे सौंदर्य इतके सुरेख आहे की येथे देशभरातील कानाकोपऱ्यातून पर्यटक रोजच हजेरी लावतात. मालवणचा समुद्र किनारा आणि समुद्र किनाऱ्या लगत वाढलेली नारळ आणि काजूची झाडे येथील नैसर्गिक सौंदर्यात भर घालतात.
तुम्ही जर मालवणला गेलात तर मालवण मध्ये मालवण बीच, देवबाग बीच आणि अर्चना बीचवर जाऊन आपल्या सुट्ट्या घालवू शकतात. येथे तुम्हाला स्कुबा डायव्हिंग करता येणार आहे. याशिवाय येथे पॅरासेलिंग, स्पीडबोट आणि जेट्स्कायचा देखील आनंद लुटता येणार आहे.