महाराष्ट्रातील ‘हा’ महत्त्वाचा महामार्ग तब्बल तीन दिवसांसाठी राहणार बंद, कारण काय?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Expressway : सध्या संपूर्ण देशभरात गणेशोत्सवाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. गणेशोत्सवाचा सण साजरा झाला की देशात शारदीय नवरात्रोत्सव साजरा होणार आहे. हा सणं पुढल्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर मध्ये साजरा केला जाईल. हा सणं धाराशिव जिल्ह्यातील तुळजाभवानी मंदिरात देखील मोठ्या आनंदात साजरा होतो.

या काळात येथे यात्रा भरते. या यात्रेसाठी दरवर्षी लाखो भाविक मंदिरात दर्शनासाठी येत असतात. यात दर्शनासाठी पायी चालत येणाऱ्या भाविकांची संख्या उल्लेखनीय आहे. या पार्श्वभूमीवर आतापासूनच जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून तयारी सुरू करण्यात आली आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय यांनी नुकताच याबाबत आढावा घेतला आहे. खरंतर या उत्सवानिमित्त सोलापूर जिल्ह्यातून हजारो भाविक तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी येतात. सोलापूर जिल्ह्यातून पायी चालत येणाऱ्या भाविकांची संख्या देखील प्रचंड असते. यामुळे या पायी वारी करणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाने तुळजापूर सोलापूर महामार्ग बाबत एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.

या शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा महामार्ग तीन दिवसांसाठी बंद केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा मार्ग 27 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर दरम्यान सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहील. या काळात हजारोंच्या संख्येने पायी वारी करणारे भाविक तुळजापूर मंदिरात दर्शनासाठी येणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, तुळजापुरातील शारदीय नवरात्र महोत्सव 6 ऑक्टोबरपासून ते 30 ऑक्टोबर दरम्यान साजरा होणार आहे. या यात्रा काळात तुळजापूर येथील देवीच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येणार आहेत. यामुळे या उत्सवाला सालाबादप्रमाणे मोठी गर्दी होणार आहे.

सोलापूरहून भाविक पायी तुळजाभवानी मातेच्या मंदिराला भेट देणार आहेत. हे पायी येणारे यात्रेकरू भाविक या महामार्गावरूनच येणार आहेत. यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. यामुळे हा मार्ग 27 ते 29 ऑक्टोबर दरम्यान वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.