गणपती बाप्पा पावला ! आता ‘या’ मार्गावर प्रवास करताना टोल लागणार नाही, शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय, वाचा डिटेल्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Expressway News : येत्या दोन दिवसात गणेशोत्सवाच्या सणाला सुरवात होणार आहे. सालाबादाप्रमाणे यंदा देखील मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाचा सण साजरा केला जाणार आहे. दरम्यान, हा सण साजरा करण्यासाठी मुंबई येथे कामानिमित्त स्थायिक झालेले कोकणातील चाकरमाने आता गावाकडे रवाना होत आहेत. मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांची संख्या आता वाढू लागली आहे.

खरंतर कोकणात गणेशोत्सवाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. हा सण साजरा करण्यासाठी मुंबई, पुणे यासारख्या महानगरांमध्ये स्थायिक झालेले कोकणातील चाकरमाने गावाकडे रवाना होत असतात. दरम्यान या चाकरमान्यांचा गणेशोत्सवातील प्रवासा संदर्भात एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांसाठी शिंदे-फडणवीस-पवार सरकारने एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

सरकारने घेतलेल्या या नवीन निर्णयानुसार आता 16 सप्टेंबर पासून ते एक ऑक्टोबर पर्यंत कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना टोल भरावा लागणार नाहीये. याबाबत राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने शुक्रवारी अर्थातच 15 सप्टेंबर 2023 रोजी शासन आदेश निर्गमित केला आहे. सदर शासन निर्णयानुसार, टोलमाफीसाठी, ‘गणेशोत्सव 2023, कोकण दर्शन’ असे लिहिलेले स्टिकर्स टोलमाफी पासच्या स्वरूपात उपलब्ध करून दिले जाणार आहेत. हे स्टिकर दाखवून या मार्गावरील प्रवाशांना टोलमधून दिलासा मिळू शकणार आहे.

या स्टिकर स्वरूपात दिल्या जाणाऱ्या पासवर वाहन क्रमांक आणि चालकाचे नाव लिहिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी हे स्टिकर वाहतूक विभाग, वाहतूक पोलीस, पोलीस आणि संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांच्या समन्वयाने पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौकी आणि आरटीओ कार्यालयात उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

या पासची विशेषता अशी की, हा गणेशोत्सवाच्या काळात दिला जाणारा पास परतीच्या प्रवासासाठी देखील चालणार आहे. मात्र असे असले तरी हा टोल माफीचा पास मुंबई – बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इतर रस्त्यांवर चालणार नाही. या रस्त्यांवर आधीसारखाच टोल लागू राहणार अशी माहिती समोर आली आहे.