महाराष्ट्रातील सर्वात लांब व रुंद बोगद्याचे काम पूर्ण ! राज्यातील ‘या’ दोन शहरांदरम्यानचा 30 मिनिटाचा प्रवास होणार फक्त 7 मिनिटात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Expressway News : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून विविध रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. राज्यात विविध महामार्गांची, उड्डाणपूलांची, कॉस्टल रोडची, सागरी मार्गाची कामे प्रगतीपथावर आहेत. यामध्ये राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर दरम्यानचा प्रवास जलद गतीने व्हावा यासाठी हाती घेण्यात आलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे देखील काम प्रगतीपथावर आहे.

सद्यस्थितीला समृद्धी महामार्गाचे दोन टप्प्यांमधील काम पूर्ण झाले आहे. सुरुवातीला समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर लांबीचा टप्पा प्रवाशांसाठी सुरू करण्यात आला. यानंतर शिर्डी ते भरवीर 80 किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला. म्हणजेच सध्या स्थितीला नागपूर ते भरवीर पर्यंतचा समृद्धी महामार्गाचा महत्वाचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू झाला आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

सध्या 700 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गापैकी 600 किलोमीटरच्या लांबीचे काम पूर्ण झाले असून हा 600 किलोमीटरचा टप्पा प्रवाशांसाठी सुरू आहे. विशेष म्हणजे या मार्गाचा उर्वरित भाग देखील लवकरात पूर्ण करून सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याचे नियोजन राज्य रस्ते विकास महामंडळाने आखले आहे. खरंतर हा महामार्ग वर्तमान उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्ट पैकी एक आहे. यामुळे याचे काम जलद गतीने करण्यासाठी शासन आणि प्रशासन कटिबद्ध आहे.

दरम्यान या मार्गाचे नुकतेच एक महत्त्वाचे काम पूर्ण झाले आहे. समृद्धी महामार्गावरील महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि सर्वात रुंद बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे आता इगतपुरी ते कासारा हा पंचवीस मिनिटांचा प्रवास फक्त सात मिनिटात पूर्ण होण्यास मदत मिळणार आहे. खरंतर, राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलेल्या समृद्धी महामार्गावर एकूण सहा बोगदे तयार केले जात आहेत.

या सहा बोगद्यांपैकी हा बोगदा सर्वाधिक रुंदीचा आणि लांबीचा होता. हा टनेल समृद्धी ग्रीन एक्सप्रेस फील्ड – वेच्या फेज – 3 च्या पॅकेज -14 अंतर्गत विकसित करण्यात आला आहे. याचे काम अफकॉन कंपनीच्या माध्यमातून पूर्ण झाले आहे. हा बोगदा नाशिक आणि ठाणे जिल्ह्यांच्या सीमेवर इगतपुरीजवळील वाशाळा येथे बांधण्यात आला आहे.

हा एक अत्याधुनिक बोगदा असून यामुळे प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार असा आशावाद व्यक्त होत आहे. हा दुहेरी बोगदा डाव्या बाजूला 7.78 किमी लांब आणि उजव्या बाजूला 7.74 किमी लांब आणि 35 मीटर रुंद असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे हा बोगदा नियोजित वेळेपेक्षा तीन महिने लवकर झाला आहे. यामुळे आता समृद्धी महामार्गाचे उर्वरित काम जलद गतीने पूर्ण होईल आणि संपूर्ण समृद्धी महामार्ग वेळेआधीच सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू होईल असे सांगितले जात आहे.

सध्यास्थितीला समृद्धी महामार्गाचा नागपूर ते भरवीरपर्यंतचा टप्पा सर्वसामान्यांसाठी सुरू झाला असून भरवीर ते ठाणे हा शंभर किलोमीटरचा टप्पा देखील डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे टार्गेट राज्य रस्ते विकास महामंडळाने ठेवले आहे. विशेष म्हणजे डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण समृद्धी महामार्ग बांधून सर्वसामान्यांसाठी सुरू होईल असा आशावाद देखील या प्रोजेक्टमध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे.