Maharashtra Expressway : महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यांना जोडणारा समृद्धी महामार्ग टप्प्याटप्प्याने खुला होत आहे. या महामार्गाचा पहिला टप्पा अर्थातच नागपूर ते शिर्डी वाहतुकीसाठी खुला झाला असून शिर्डी ते मुंबई हा टप्पा देखील डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचा टारगेट राज्य रस्ते विकास महामंडळाने ठेवले आहे. अशातच महाराष्ट्रासाठी अजून एका महामार्गाची घोषणा करण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात या महामार्गासाठी नीधीची तरतूद देखील शिंदे फडणवीस सरकारने केली आहे. समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर तयार होणारा हा नागपूर ते गोवा महामार्ग म्हणजेच शक्तिपीठ महामार्ग राज्यातील आध्यात्मिक पर्यटन क्षेत्रासाठी विशेष लाभ प्रद राहणार असून यामुळे राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र परस्परांना कनेक्ट होणार आहेत. या महामार्गाचे सर्वात मोठी विशेषता म्हणजे हा मार्ग सध्याच्या नागपूर मुंबई समृद्धी महामार्गापेक्षा अधिक लांब राहणार आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा आहे. तूर्तास हा राज्यातील सर्वात लांबीचा महामार्ग आहे. परंतु शक्तीपीठ महामार्ग तयार झाल्यानंतर नागपूर-गोवा म्हणजेच शक्तिपीठ महामार्ग सर्वाधिक लांबीचा महामार्ग बनेल.
शक्तीपीठ महामार्गाची प्रस्तावित लांबी ही 760 किलोमीटर पेक्षा अधिक राहणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हा महामार्ग समृद्धी महामार्गापेक्षा लांब राहणार असून राज्यातील एकूण बारा जिल्ह्यांना परस्परांना जोडणार आहे. अर्थसंकल्प 2023 मध्ये या मार्गासाठी 86 हजार 300 कोटी रुपयांची तरतूद देखील झाली आहे.
हे पण वाचा :- नोकरीची सुवर्णसंधी ! राज्यातील ‘या’ महापालिकेत विविध पदासाठी भरती सुरु; आजच करा अर्ज
राजधानी नागपूर आणि देशातील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ अर्थातच गोवा यांना जोडणारा हा शक्तीपीठ महामार्ग अध्यात्मिक दृष्ट्या विशेष महत्त्वाचा राहणार आहे. या महामार्गामुळे राज्यातील माहूर, तुळजापूर, कोल्हापूर, आंबेजोगाई ही शक्तीपीठे तसेच औंढा नागनाथ, परळी वैजनाथ ही दोन ज्योतिर्लिंग, नांदेड गुरुद्वारा, पंढरपूर, कारंजा लाड, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी औदुंबर जोडले जाणार आहेत. हा मार्ग राज्यातील बारा जिल्ह्यातून प्रस्तावित आहे. हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, वर्धा, यवतमाळ, सोलापूर, सांगली, कोल्हापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधून हा मार्ग जाणार आहे.
हे पण वाचा :- Mumbai Job : मुंबईत नोकरीची सुवर्णसंधी ! महापालिकेत ‘या’ पदासाठी निघाली मोठी भरती; असा करा अर्ज