Maharashtra Cotton Rate : कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित केले जाणारे एक महत्त्वाचे पीक आहे. या पिकाची संपूर्ण राज्यभर शेती केली जाते. प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश या तीन विभागात कापसाची लागवड पाहायला मिळते.
कापसाला पांढरे सोने म्हणून ओळखतात. पण गेल्या दोन हंगामापासून कापसाचे पीक शेतकऱ्यांसाठी डोईजड ठरू लागले आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कापसाची एकरी उत्पादकता कमी झाली आहे आणि दुसरे म्हणजे कापसाला अपेक्षित असा भाव मिळत नाहीये.
सध्या बाजारात कापसाचे बाजार भाव हमीभावाच्या आसपास पाहायला मिळत आहेत. यंदा कमी पावसामुळे कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. अशा परिस्थितीत कापसाला चांगला भाव मिळणे आवश्यक आहे.
कापसाचे कमी उत्पादन झाले असल्याने बाजार भाव चांगला मिळाला तरच कापसाचे पीक शेतकऱ्यांना परवडणार आहे अन्यथा कापूस उत्पादक यंदा कर्जबाजारी होतील असे बोलले जात आहे. सध्या स्थितीला मात्र कापसाचे बाजार भाव दबावात आहेत.
कापसाला किमान आठ ते दहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव मिळाला पाहिजे अशी भोळीभाबडी अशा शेतकऱ्यांची आहे. प्रत्यक्षात मात्र कापसाचे बाजार भाव सात हजार रुपये प्रति क्विंटल ते 7200 रुपये प्रति क्विंटल च्या आसपासच पाहायला मिळत आहे.
अशा परिस्थितीत सध्या बाजारात मिळत असलेल्या दरात कापूस पीक कसे परवडणार हाच सवाल शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. दरम्यान आज आपण 25 डिसेंबर 2023 रोजी राज्यातील बाजारात कापसाला काय भाव मिळाला आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कापसाला किमान साडेपाच हजार रुपये, कमाल सात हजार रुपये आणि 6250 रुपये प्रतिक्विंटल असा सरासरी दर मिळाला आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती : या एपीएमसी मध्ये कापसाला किमान 7000 कमाल 7050 आणि सरासरी सात हजार वीस एवढा भाव मिळाला आहे.
काटोल कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये कापसाला कीमान साडेसहा हजार, कमाल 6850 आणि सरासरी 6650 एवढा भाव मिळाला आहे.
पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कापसाला किमान साडेसहा हजार रुपये, कमाल 7200 आणि सरासरी 6950 एवढा भाव मिळाला आहे.