Maharashtra Bus : तब्बल 500 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर श्रीक्षेत्र अयोध्या येथील भव्य राम मंदिरात प्रभू श्रीराम विराजमान झाले आहेत. या भव्य मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारी 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाले आहे. तसेच 23 जानेवारीपासून हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे.
यामुळे सध्या राम भक्तांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. श्रीक्षेत्र आयोध्या येथे देशातील कानाकोपऱ्यातील भाविक हजेरी लावत आहेत. यामध्ये महाराष्ट्रातीलही हजारो भाविक अयोध्या येथे प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी रवाना होत आहेत.
अशातच आता एसटी महामंडळाने एक अतिशय महत्त्वाचा आणि राम भक्तांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाने अयोध्या दर्शन यात्रेचे आयोजन केले आहे.
या योजनानुसार मराठवाड्यातील बीड येथून श्रीक्षेत्र अयोध्या साठी एसटी महामंडळाची लाल परिधान आहे. बीड आगारातून एसटी महामंडळाची बस थेट अयोध्या, प्रयागराज आणि वाराणसी अर्थातच काशीसाठी चालवली जाणार आहे.
यामुळे राम भक्तांना प्रभू श्रीरामांचे सहजतेने दर्शन घेता येणार आहे. शिवाय उत्तर प्रदेश मधील प्रयागराज आणि वाराणसी या तीर्थक्षेत्रांवर जाऊन देखील भाविकांना दर्शन घेता येणार आहे.
यामुळे एकाच वेळी तीन तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेण्याचे सौभाग्य बीड करांना उपलब्ध होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील भाविकांच्या माध्यमातून एसटी महामंडळाच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
किती तिकीट दर राहणार?
एसटी महामंडळाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार बीडहुन सुरू होणाऱ्या या एसटी बससाठी भाविकांना 5 हजार 100 ते सात हजार पाचशे रुपयांपर्यंतचे तिकीट काढावे लागणार आहे.
यामध्ये साध्या बससाठी पाच हजार शंभर रुपये, आसन शयनयान बससाठी 6,900 आणि शयनयान बससाठी 7,500 रुपये मोजावे लागणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उद्यापासून या तीनही प्रकारच्या बसेस भाविकांसाठी उपलब्ध राहणार आहेत. या बसेस मागणीनुसार उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
तसेच जर या महामंडळाच्या लाल परीला चांगला प्रतिसाद मिळाला तर या बसेस कायम करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. विशेष म्हणजे बीड आगारातून पहिल्यांदाच उत्तर प्रदेश राज्यातील तीर्थक्षेत्रांसाठी बस चालवली जात असल्याची माहिती समोर आली आहे.