Maharashtra Bullet Train : गेल्या काही वर्षांच्या काळात भारतात पायाभूत सुविधा विकसित करण्यावर शासनाने विशेष जोर दिला आहे. या अंतर्गत देशात रस्ते विकासाची अनेक महत्त्वाची कामे केली जात आहेत. विविध महामार्गांची कामे सुरू आहेत. सोबतच, रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यावर देखील लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. वंदे भारत एक्सप्रेस सारख्या हायस्पीड ट्रेन सुरू केल्या जात आहेत.
आतापर्यंत देशातील 34 महत्त्वाच्या मार्गावर ही ट्रेन सुरू झाली आहे आणि विशेष म्हणजे मार्च 2024 पर्यंत देशातील 75 महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचे नियोजन रेल्वेने आखले आहे. एवढेच नाही तर पुणे नागपूर आणि राजधानी मुंबईमध्ये विविध मार्गांवर मेट्रो चालवल्या जात आहेत.
एवढेच आहे तर देशात आता बुलेट ट्रेन देखील धावणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशातील पहिली बुलेट ट्रेन आपल्या महाराष्ट्रातून धावणार आहे. देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्र राज्याची राज्य राजधानी मुंबईला देशाच्या पहिल्या बुलेट ट्रेन चा लाभ मिळणार आहे.
मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर ही पहिली बुलेट ट्रेन सुरू होणार आहे. दरम्यान या मार्गावर धावणाऱ्या बुलेट ट्रेन संदर्भात एक अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. देशाची पहिली बुलेट ट्रेन कशी राहणार याबाबत महत्त्वाची माहिती पुढे आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई ते अहमदाबाद येथील साबरमती दरम्यान धावणारी बुलेट ट्रेन जपानची शिंकनसेन ई-5 मालिका या बुलेट ट्रेनसारखीच राहणार आहे. अर्थातच जपानमध्ये धावणाऱ्या हायटेक बुलेट ट्रेन प्रमाणेच हिंदुस्थानातील बुलेट ट्रेन देखील हायटेक राहणार आहे. तथापि, भारतीय वातावरण लक्षात घेऊन या गाडीची रचना करण्यात येणार आहे.
कशी असेल हिंदुस्थानातील पहिली बुलेट ट्रेन
गेल्या अनेक दिवसांपासून देशात बुलेट ट्रेनच्या चर्चा रंगल्या आहेत. नागरिकांमध्ये बुलेट ट्रेन कशी राहणार, याची रचना कशी असेल याविषयी देखील मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. दरम्यान याच संदर्भात आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 690 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असलेल्या या ट्रेनमध्ये विमानाप्रमाणेच प्रथम श्रेणी, बिझनेस क्लास आणि इकॉनॉमी क्लास म्हणजेच स्टँडर्ड क्लास राहणार आहे.
तर सीट्स फ्लाइटच्या तुलनेत अधिक आरामदायी आणि आलिशान राहणार आहेत.सुरुवातीला या ट्रेनला 10 डबे राहणार आहेत. नंतर, आवश्यकतेनुसार, डब्यांची संख्या वाढवली जाईल आणि ही संख्या 16 डब्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न असेल. या बुलेट ट्रेनच्या फर्स्ट क्लासमध्ये 15 प्रवाशी बसतील, बिझनेस क्लासमध्ये ५५ आणि इकॉनॉमी क्लासमध्ये ६२० प्रवासी बसू शकतील अशी माहिती समोर आली आहे.खास म्हणजे विमानापेक्षा ट्रेनच्या आत जास्त जागा असलेले टॉयलेटही असेल.
एकंदरीत बुलेट ट्रेन मध्ये सर्व हायटेक सोयी सुविधा पुरविल्या जाणार आहेत. स्तनदा मातांसाठी स्वातंत्र्य कक्ष राहणार आहे जेणेकरून स्तनदा मातांना नवजात बालकाला फीडिंग करता येईल. तसेच एखादा प्रवासी आजारी असेल तर त्याला या स्वातंत्र कक्षात आराम सुद्धा करता येणार आहे.ट्रेनच्या आतल्या डब्यांमध्ये विमानाप्रमाणेच सामान ठेवण्यासाठी ओव्हरहेड लगेज रॅक उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
तसेच दोन आसनांमधील पायांच्या जागेत कोणतीही कपात केली जाणार नाही. फर्स्ट आणि बिझनेस क्लासच्या जागा हलवता येणार आहेत. यामध्ये एलईडी लाइटिंगसोबत रिडिंग लॅम्पची सुविधा सुद्धा दिली जाणार आहे. जेणेकरून कोणाला ट्रेनमध्ये अभ्यास किंवा काम करायचं असेल तर तो ते करू शकेल. मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर उपकरणांच्या चार्जिंगसह इतर सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
मुंबई ते साबरमती अशा 508 किलोमीटरवर हा बुलेट ट्रेन मार्ग विकसित केला जाणार आहे. दरम्यान या बुलेट ट्रेन प्रकल्पाअंतर्गत विकसित होणारा सुरत ते बिल्लीमोरा हा मार्ग 2026 पर्यंत सर्वसामान्यांसाठी खुला केला जाण्याची शक्यता आहे. एकंदरीत देशातील हा पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प 2026 पर्यंत सुरू होणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात सुरत ते बिल्लीमोरा दरम्यान बुलेट ट्रेन धावेल आणि त्यानंतर मग टप्प्याटप्प्याने हा संपूर्ण मार्ग सर्वसामान्यांसाठी खुला केला जाईल अशी माहिती काही मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.