मोठी बातमी ! आज महाराष्ट्रातील ‘हे’ महत्त्वाचे विमानतळ राहणार बंद ; कारण काय ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Airport : विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आज 17 ऑक्टोबर रोजी राज्यातील एक महत्त्वाचे विमानतळ बंद केले जाणार आहे. यामुळे तुम्हीही जर कुठे हवाई मार्गे प्रवास करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही बातमी विशेष खास राहणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज राजधानी मुंबईमधील आंतरराष्ट्रीय विमानतळ सहा तासांसाठी बंद ठेवले जाणार आहे. यामुळे विमान प्रवाशांना या निर्णयाचा फटका बसणार आहे. खरंतर, देशाच्या आर्थिक राजधानीत आणि महाराष्ट्राच्या राज्य राजधानीत वसलेले हे विमानतळ देशातील एक प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात व्यस्त विमानतळ म्हणून या विमानतळाला ओळखले जाते. हे विमानतळ आज सकाळी अकरा वाजल्यापासून बंद केले जाणार आहे. तसेच सहा तासांसाठी हे विमानतळ बंद ठेवले जाणार आहे. अर्थातच सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुंबई एअरपोर्ट आज वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

यानंतर मात्र पुन्हा एकदा विमान पूर्ववत सुरू होणार आहे. सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत विमानतळ बंद असेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा मुंबई एअरपोर्ट वाहतुकीसाठी सुरू होईल असे सांगितले जात आहे. 

विमानतळ बंद ठेवण्याचे कारण नेमके काय ?

दरवर्षी मुंबई एअरपोर्टवर मान्सूनच्या आधी आणि मान्सूननंतर धावपट्टीची दुरुस्तीची कामे केली जातात. धावपट्टी म्हणजेच रनवेच्या देखभालीच्या कामासाठी मान्सून आधी आणि मानसून नंतर नेहमीच मुंबई एअरपोर्ट बंद ठेवला जातो.

या आधी म्हणजेच मान्सूनपूर्वी देखभालीच्या कामासाठी एअरपोर्ट बंद ठेवण्यात आले होते आता मान्सून संपला असल्याने आज 17 ऑक्टोबर 2023 रोजी मुंबई एअरपोर्ट पुन्हा एकदा रनवेच्या देखभालीच्या कामासाठी बंद ठेवले जाणार आहे. एकंदरीत विमानतळ बंद न ठेवता रनवेच्या देखभालीची कामे करता येणे अशक्य असल्याने मुंबई विमानतळ आज सहा तासांसाठी बंद राहणार आहे.

या कालावधीत मुंबई विमानतळावरून एकही विमान टेक ऑफ घेणार नाही आणि विमानतळावर एकही विमान लँड होणार नाही. विशेष बाब अशी की, विमानतळ प्रशासनाने याबाबत सहा महिन्यापूर्वीच विमान कंपन्यांना कळवले होते.

तसेच, विमान कंपन्यांनी यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे अशा सूचना देखील प्रशासनाच्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यांपूर्वीच देण्यात आल्या आहेत. त्यामुळे विमानतळ बंदचा प्रवाशांवर फारसा विपरीत परिणाम होणार नाही असे सांगितले जात आहे.