महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची पुन्हा एकदा कर्जमाफी होणार ! किती लाखांपर्यंतचे कर्ज होणार माफ, कोणाला मिळणार लाभ ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Agriculture News : गेल्या महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला होता. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला.

एवढेच नाही तर या योजनेअंतर्गत नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय देखील तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वित्तमंत्री अजित दादा पवार यांनी घेतला होता.

यापैकी कर्जमाफीची अंमलबजावणी ही गेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातच झाली. मात्र, या योजनेअंतर्गत दिले जाणारे प्रोत्साहनपर अनुदान वर्तमान शिंदे सरकारच्या काळात वितरित होत आहे. अजूनही या अनुदानाचे वितरण सुरूच आहे.

विशेष बाब म्हणजे युती सरकारच्या काळात देखील राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली होती. युती सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती.

छत्रपती शिवाजी महाराज कर्ज मुक्ती योजनेअंतर्गत त्यावेळी राज्यातील शेतकऱ्यांची दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी करण्यात आली होती. त्यावेळी कर्जमाफीसाठी जवळपास 50 लाख शेतकरी पात्र ठरले होते.

या पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून प्रमाणपत्र देऊन कर्जमाफी झाली असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, या योजनेअंतर्गत राज्यातील फक्त 44 लाख शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळाला. पण उर्वरित सहा लाख शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफीचा लाभ मिळू शकलेला नाही.

युती सरकार कोसळल्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार आले. मात्र महाविकास आघाडी सरकारने छत्रपती शिवाजी महाराज योजनेअंतर्गत पात्र असूनही वंचित ठरलेल्या सहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राबविण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेचा देखील त्या वंचित शेतकऱ्यांना लाभ मिळू शकला नाही.

यामुळे, यासंबंधीत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली गेली पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली आहे. आता राज्यात महायुतीचे सरकार आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती योजना ज्यांनी सुरू केली ते देवेंद्र फडणवीस आता सत्तेत आहेत.

यामुळे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत वंचित ठरलेल्या त्या सहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. या मागणीच्या पार्श्वभूमीवर काल अर्थातच 18 डिसेंबर 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज योजनेअंतर्गत वंचित असलेल्या शेतकऱ्यांची साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली जाईल असे सांगितले आहे. यासाठी कर्जमुक्ती योजनेचे पोर्टल पुन्हा सुरू करण्यात येणार असून साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली जाणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा